Amalner

?अमळनेर येथे आज आयुक्तांच्या आदेशानुसार उपायुक्त डॉ अर्जुन चिखले यांचा आढावा दौरा…विविध खेड्यां मध्ये जाऊन केली पाहणी…

? अमळनेर येथे आज आयुक्तांच्या आदेशानुसार उपायुक्त डॉ अर्जुन चिखले यांचा आढावा दौरा…विविध खेड्यां मध्ये जाऊन केली पाहणी…

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर मा आयुक्त यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्हा भरात विविध कामांचा आढावा घेण्याचे कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज अमळनेर येथे उपायुक्त डॉ अर्जुन चिखले यांचा आढावा दौरा संपन्न झाला. यात आंचलवाडी येथे शेतकरी आत्महत्या कुटुंबाला भेट,जवखेडा येथे बिहार पॅटर्न वृक्ष लागवड ,रणाईचे येथे फळं बाग,शिरूड येथे प्राथमिक शाळेचे वॉल कंपाउंड पाहणी,रोजगार हमी योजना अंतर्गत गोठा,इ ची पाहणी करून प्रताप महाविद्यालय येथे सर्व अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत उभारी योजना,रोजगार हमी योजना, सामाजिक वनीकरण,कोव्हीड 10 ची स्थिती,माझे कुटुंब माझी जबाबदारी आढावा,घरकुल योजना,शौच खड्डे आणि पुनर्भरण कामे,ग्राम पंचायत आणि ग्राम सेवक यांची कामे,इ संदर्भात आढावा घेतला.
या बैठकीत मा उपयुक्त डॉ अर्जुन चिखले यांनी झाडा झडती घेत ग्राम सेवकांना स्टॅक रजिस्टर माहीत नसतात,मस्टर व्यवस्थित भरले जातात का? किती ग्राम सेवकांवर कार्यवाही केली?रेकॉर्ड अपडेट असले पाहिजे,15 ग्रामपंचायत ना कारणे दाखवा नोटीस बजावली,सन2017 18,18-19,19-20 घरकुल अपूर्ण इ ग्रामीण भागातील सूचना वजा तंबी गटविकास अधिकारी यांना दिली. तसेच सामाजिक वनीकरण आणि कृषी विभागांना सूचना देण्यात आल्या.

जुनी कामे पेंडिंग ठेवू नका,खर्च नसेल तर कामे वगळा, मागील वर्षाच्या कामांना मंजुरी देऊ नका, अश्या प्रकारच्या सूचना डॉ अर्जुन चिखले यांनी दिल्या आहेत.
यावेळी अमळगाव येथील निराधार मुलास मोबाईल फोन भेट डॉ चिखले यांच्या हस्ते देण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button