Nashik

आरोग्य विभागासह कोविड 19, ओमीक्रोनचा ना.डॉ.भारती प्रवीण पवार यांनी घेतला आढावा

आरोग्य विभागासह कोविड 19, ओमीक्रोनचा ना.डॉ.भारती प्रवीण पवार यांनी घेतला आढावासुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधीनाशिक येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे आरोग्य विभागासह कोविड-१९, ओमिक्रोन तसेच इतर आरोग्य विभागातील सर्व विषयांचा ना.डॉ.भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा घेण्यात आला. या बैठकीत नाशिक विभागातील covid-19 च्या वाढत्या तिसरा लाटेतील वाढती रुग्णसंख्या व केंद्र सरकारने दिलेल्या संभाव्य रुग्ण संख्येच्या प्रमाणात केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. त्यात ऑक्सिजन बेड, ICU, लहान मुलांसाठी PICU, HDU, सेंटर ऑफ एक्सलन्स, फिल्ड हॉस्पिटल यासारख्या इन्फ्रास्ट्रक्चरची कामे व वाढत्या रुग्णसंख्येसाठी तपासणी किटस, अद्ययावत प्रयोगशाळा, रुग्णवाहिका, ऑक्सीजनची तयारी, त्यात PSA प्लांट, LMO प्लांट या सर्व बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला. या सर्व covid-19 उपचारासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आजपर्यंत ECRP-१ व ECRP-२ अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे.
ECRP-१ मध्ये रु.११६ कोटी ६० लाख निधी देण्यात आलेले होते. ECRP-२ मध्ये रु.११२ कोटी ३८ लाख निधी देण्यात आलेले आहे. सदर बैठकीत कोविड लसीकरणाचा देखील आढावा घेण्यात आला. केंद्र सरकारच्या माध्यमातून नाशिक विभागाकरीता पुरेशा प्रमाणात लस देण्यात आलेली आहे व आजही पुरेशा प्रमाणात लससाठ उपलब्ध आहे .
नियमित राष्ट्रीय आरोग्य अभियाना (NHM) अंतर्गत नाशिक विभागाकरिता रु.४३४ कोटी ३२ लाख निधी हा एका वर्षाकरीता मंजूर करण्यात आलेला आहे. “प्रधानमंत्री मातृ वंदना योजना” या अंतर्गत आत्तापर्यंत एका वर्षात नाशिक विभागात रु.१४८ कोटी ९२ लाख वाटप करण्यात आलेले आहे व ते यापुढेही सुरू राहणार आहे. तसेच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी मग त्यात सबसेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय यांच्या दुरुस्ती व नवीन बांधकामाकरीता रु.११२ कोटी ६४ लाख निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यात ११४ कामे मंजूर आहेत.
१३ वा वित्त आयोगातून नाशिक विभागामध्ये १२७ कामांसाठी रु.५८ कोटी ३८ लाख निधी मंजूर झाला आहे व ती कामेही प्रगतीपथावर आहेत असे उपस्थिती अधिकाऱ्यांनी ना.डॉ.भारती पवार यांना सांगितले.
नाशिक विभागातील ग्रामीण व आदिवासी भागाकरिता एकूण १५ दंत वैद्यकीय शिबिरे मंजूर झालेले असून त्याकरिता रु.६५ लाख अनुदान मंजूर झालेले आहे व ते वितरित करण्यात आलेले आहे या शिबिरा अंतर्गत ग्रामीण आदिवासी भागातील गरजू रुग्णांना मोफत तपासणी, विविध शस्त्रक्रिया व दंत आरोग्याचा मोफत लाभ मिळणार आहे.
आयुष्यमान भारत योजनेचा आढावा घेताना नाशिक विभागातील एकूण पात्र लाभार्थी 53,38,896 इतके आहे, परंतु 15,76,567 रुग्णांना गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आल्याचे आढळले. इतर सर्व पात्र लाभार्थ्यांना तात्काळ कार्ड वाटप करण्याच्या सक्त सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
सदर बैठकीत नाशिक विभागाचे उपसंचालक डॉ.पी.डी. गांडाळ, प्राचार्य डॉ.वाघचौरे, सहसंचालक डॉ.एम.आर. पट्टणशेट्टी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, डॉ.चारुदत्त शिंदे, डॉ.किरण पाटील, डॉ.बांगर तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, डॉ.संतोष नवले, डॉ.बावा, डॉ.पांढरे, डॉ.दहिफळे व आरोग्य अधिकारी म.न.पा. डॉ.बापूसाहेब नागरगोजे, डॉ.जयश्री पाटील आदि अधिकारी वर्ग उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button