Jalgaon

दिव्यांग बांधवांच्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या समस्यां विषयी जळगावं वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय येथे प्रहार संघटनेची आढावा बैठक संपन्न

दिव्यांग बांधवांच्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या समस्यां विषयी जळगाव वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय येथे प्रहार संघटनेची आढावा बैठक संपन्न

प्रतिनिधी प्रविण पाटील –

अपंग बांधवाना वेळेवर प्रमाणपत्र मिळत नाही तसेच प्रमाणपत्रावर कधी तारीख तर कधी टक्केवारी कमी किंवा जास्त व टोकन पद्धती विषयीं असलेली नाराजगी अशा विविध समस्या न ची प्रहार जिल्हा अध्यक्ष बाळा साहेब पाटील यांच्या कडे अपंग बांधवांनी आपले गरहाने सांगीतले या गोष्टीची प्रहार संघटना जील्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी दखल घेऊन मेडिकल बोर्ड शी बैठीकीचे नियोजन दिंनाक 17/02/2022 जळगांव सिव्हील हॉस्पिटल चे दिव्यांग बोर्ड चे अध्यक्ष डॉ मारोती पोटे यांच्या समवेत मीटिंग चे आयोजन केले होते अपंग बांधवांच्या विविध समस्या व उपाय योजना या संदर्भातील ही बैठक संपन्न झाली ह्या बैठकीत अपंग बांधवांच्या अपंग प्रमाणपत्र तसेच तालुका स्तरावर कॅम्प चे नियोजन 100 टक्के अपंग असलेल्या व्यक्तींना कायमस्वरूपी प्रमाण पत्र देण्यात यावे अशा विविध मुद्यांवर चर्चा झाली मेडिकल बोर्ड चे अध्यक्ष मारोती पोटे यांनी अपंग बांधवांच्या समस्या तातडीने सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले तसेच ह्या बैठकीला प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, राजमल पाटील, शकील भाई, संगीता पाटील, स्वाती कुमावत, प्रकाश पाटील, सरला गढरी आरिफ शेख हरीश भाऊ व अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button