Bid

बीड जिल्ह्यात केज येथे राष्ट्रवादी उद्योग सेल ची आढावा बैठक संपन्न

बीड जिल्ह्यात केज येथे राष्ट्रवादी उद्योग सेल ची आढावा बैठक संपन्न

रफिक अत्तार बीड

बीड : आज बीड जिल्ह्यातील केज येथे मा. बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा येडेश्वरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.बजरंग बप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्योग व व्यापार सेलची बैठक संपन्न झाली यावेळी राष्ट्रवादी उद्योग व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष मा . नागेशदादा फाटे यांनी पक्ष संघटन विषयी चर्चा करून तालुका ते जिल्हा पक्षबांधणी छोटे उद्योजक मोठे व्यापारी पक्षात सामावून घेणे या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मा. पंचायत समिती सदस्य तथा जिल्हाचिटणीस बीड मा. दत्तात्रय ठोंबरे , राष्ट्रवादी ता . अध्यक्ष संजूदादा मोराडे, नगरसेवक केज रामचंद्र गुंड , राष्ट्रवादी अल्पसंख्याक ता अध्यक्ष ईस्माईल शेख , रा . युवक अध्यक्ष मुकुंद कणसे,कुंबेलळ सरपंच किशोर थोरात, चंदन सावरगाव सरपंच मधूकर तपसे, उंबरी- सावंतवाडी उपसरपंच गणेश सावंत,रहीम शेख, प्रविण पवार शिवलिंग मुराळे, निलेश कागदे, पंढरपूर ता . उपाध्यक्ष कल्याण कुसूमडे तसेच विविध गावचे संरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button