Pandharpur

आफ्रोह’चा राज्य सरकारला इशारा ….तर 2 ऑक्टोबर गांधी जयंती च्या दिवशी सेवानिवृत्त कर्मचारी आझाद मैदानावर करणारआमरण उपोषण !

आफ्रोह’चा राज्य सरकारला इशारा
….तर 2 ऑक्टोबर गांधी जयंती च्या दिवशी सेवानिवृत्त कर्मचारी आझाद मैदानावर करणारआमरण उपोषण !

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपुर डिसेंबर 2019 पासून आतापर्यत शेकडो कर्मचारी सेवानिवृत्त झाले तर काही अधिसंख्य कर्मचारी नोकरीत असतांना विविध कारणाने मरण पावले. अशा कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन व इतर लाभ अद्याप देण्यात आले नाही. 30 सप्टेंबर 2021 पर्यत जर सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर दि.2 ऑक्टोबर गांधी जयंती च्या दिवशी सेवानिवृत्त कर्मचारी मंत्रालयासमोर आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ऑर्गनायझेशन फाॅर राईटस ऑफ ह्युमन ,महाराष्ट्रच्या वतीने देण्यात आला आहे.
दि.6 जुलै 2017 च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी दि.21डिसेंबर 2019 ला महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढला. या शासन निर्णयानुसार ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती अनुसूचित जमाती प्रवर्गातून झाली होती मात्र त्यांनी जात प्रमाणपत्र वैधता दिली नाही अशा कर्मचाऱ्यांना 11महिन्याच्या अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले.
या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचा-यांना सेवाविषयक लाभ देण्यासाठी छगन भुजबळ मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.
मा. छगन भुजबळ समितीचा अहवाल अद्याप शासनास प्राप्त झाला नाही हे कारण सांगून शासन वेळकाढूपणा करीत आहे. छगन भुजबळ समितीला आतापर्यत 3 वेळा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी आर्थिक संकटात सापडला. त्यांचे जीवन जगणे दुराप्रस्त झाले. सेवानिवृत्त कर्मचारी मानसिकदृष्ट्या खचत आहे. ऑफ्रोह संघटनेने अनेक वेळा शासनाला निवेदन देऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आफ्रोहच्या शिष्टमंडळाने अनेक मंत्री व आमदारांच्या सुद्धा भेटी घेऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची गळ घातली. मात्र 21 महिन्यापासून कोणत्याही प्रकारची दखल शासनाकडून घेण्यात आली नाही. शेवटी घरी बसून उपाशी मरण्यापेक्षा मंत्रालयासमोर मरेपर्यंत उपोषण केलेले बरे या टोकाच्या मानसिकतेपर्यंत सेवानिवृत्त कर्मचारी आले आहे.सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा ऑफ्रोह संघटनेकडे आंदोलन; उपोषण करण्यास तयार असल्याचे बोलून दाखवले. त्यामुळे दि.5 ऑगस्ट 2021 पासून प्रत्येक जिल्ह्यात साखळी उपोषणसुद्धा करण्यात आले होते. तरीदेखील शासनाने दखल घेतली नाही. नाईलाजाने दि.2ऑक्टोबर गांधी जयंती च्या दिवशी सेवानिवृत्त कर्मचारी मंत्रालयासमोर आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करणार आहे. आफ्रोह संघटनेने शासनास याबाबत नोटीस बजावली आहे. 30 सप्टेंबर 2021 पर्यत जर सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर आझाद मैदानावर कोणत्याही परिस्थितीत उपोषण होणार. पोलीस यंत्रणेची परवानगी मिळाली नाही तर उपोषण करणारे सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम आहेत.मंत्री; खासदार; आमदार; लोकप्रतिनिधी; नेत्यांनी वेळीच लक्ष घालून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आराम करण्याच्या वयात उपोषण करण्याची वेळ आणू नये. अन्यथा कर्मचाऱ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा आफ्रोहच्या राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर, राज्य उपाध्यक्ष राजेश सोनपरोते सोलापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बळवंतराव यांनी दिला आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button