Amalner

सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील यांचा सत्कार

सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील यांचा सत्कार

अमळनेर : अमळनेर तालुक्यातील सेवानिवृत्त व कार्यक्षम अभ्यासू केंद्रप्रमुख गोकुळ आबा पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने त्यांचा नुकताच शाल श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील यांचा सहपत्निक सत्कार प्रसंगी ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष
ईश्वर .आर. महाजन,ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हा संघटक अजय भामरे,ओबीसी शिक्षक असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सोपान भवरे होते.
सत्काराला उत्तर देतांना सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील म्हणाले की मी 37 वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली. या प्रामाणिकपणाच्या सेवेचे मला
माझ्या जीवनात त्याचे उत्तम फळ मिळाले. मी केंद्रप्रमुख असताना शिस्त ,विद्यार्थ्यांची गुणवत्ता याला अधिक महत्त्व दिले. वेळप्रसंगी शिक्षकांवर रागावलो तर कधीही जवळही घेतले.शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी, मुख्याध्यापक,शिक्षक माझे मित्र आहेत. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात अनेक चांगले मित्र हीच माझी कार्याची पावती आहे.
सेवानिवृत्त केंद्रप्रमुख पाटील पुढे म्हणाले की आपण अध्यापनात वेळ, शिस्त, गुणवत्तेला अधिक महत्त्व दिले तर आपल्याला गावाच्या शैक्षणिक दर्जा वाढवण्यात वेळ लागत नाही गावातील व पालकांनी केलेली शाबासकी हा मोठा पुरस्कार असतो. शिक्षक पुरस्कार माझ्या कारकीर्दीत मी कधी घेतला नाही. उलट अनेकांच्या नावाची शिफारस मी केली .एखादा शिक्षक चुकला असेल त्याच्या तोंडावर मी बोललो. कधीही त्याची पाठराखण केली नाही. गुणवत्तेशी कधीही तडजोड केली
नाही असे त्यांनी सांगितले. आपण माझा सत्कार केला मी सदैव ओबीसी शिक्षक असोसिएशनचा ऋणी राहील असे सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button