Amalner

नवसाला पावणारा अमळनेरचा माऊलीचा गणराज

नवसाला पावणारा अमळनेरचा माऊलीचा गणराज

अमळनेर : अमळनेर येथे प्रसिद्ध असलेल्या श्री संत सखाराम महाराज माऊली मित्र मंडळ म्हणजेच वाडी चौक येथील गणपतीचे हे ८७ वे वर्ष असून अत्यंत जागृत असा हा माऊलीचा राजा म्हणून ओळखला जातो भक्तांच्या श्रद्धेला फळ देणारे दैवत म्हणून या गणेशाची ख्याती आहे.

अमळनेरच्या बापूराव पाटील सर यांच्या इच्छीत मनोकामना नवस पूर्ण झाल्याने आज रोजी त्यांनी सोन्याचे कानातले नवस म्हणून बाप्पास अर्पण केले. या आधीही भावीक भक्तांनी सोने व चांदीचे वस्तु अर्पण केल्या आहेत. सकाळ सायंकाळ भाविकांची आरतीला भव्य गर्दी असते व नारळाचा हार अर्पण करून आपला नवस करीत असतात

गणेशोत्सवात येथे भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. गणपती हा ओकांर ब्रह्मस्वरुप आहे. सर्व भक्तांना तो पावतो. त्यांची संकटे दूर करतो, अशी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये श्रद्धा आहे. या मित्र मंडळाची गणरायाची मूर्ती दरवर्षी अत्यंत देखणी व आकर्षक असते. या मंडळाची स्थापना १९३४ रोजी संत सखाराम महाराज संस्थांनाचे १० वे गादीपती ह.भ.प. प.पु संत ज्ञानेश्वर महाराज यांनी केली होती असे मंडळमधील जेष्ठ नागरिक आवर्जून सांगतात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button