sawada

सावद्यात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात झाला साजरा.

सावद्यात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात झाला साजरा.

—————————————-
“सावदा पालिकेच्या १०० वर्षाच्या इतिहासात प्रथम वेळी सन १९८४ मध्ये लागलेल्या प्रशासकीय राजवट मध्ये मुख्याधिकारी भोंगळे यांना ध्वजारोहण करण्याचा बहुमान प्राप्त झालेला होता.त्यानंतर सन २०२१-२२ मध्ये लागलेल्या दुसऱ्या प्रशासकीय राजवट मध्ये २६ जानेवारी २०२२ रोजी नगरपालिकेवर सरासरी ४० वर्षानंतर मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांना ध्वजारोहण करण्याचा बहुमान मिळालेला आहे.”
—————————————-
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे कारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल,डायमंड इंग्लिश मिडीयम शाळा, श्री.आ.ग.हायस्कूल,नाना साहेब विष्णू हरी कन्या शाळा,न.पा.उर्दू मुला-मुलींची शाळा व मराठी न.पा मुला-मुलींची शाळा सह नगरपालिका,पोलीस स्टेशन,वीज वितरण कार्यालय,सार्वजनिक बांधकाम विभागा,शहीद अब्दुल हमिद स्मार्क इत्यादी ठिकाणी संबंधित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावदा येथे कारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल येथे इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष अकबर खान अमानुल्ला खान, डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल येथे शाळेचे संस्थापक तथा हाजी इक्बाल हुसैन मल्टीपर्पस फाउंडेशनचे सचिव हाजी शेख हारून शेख इक्बाल, नगरपालिका येथे मुख्याधिकारी किशोर चव्हाण,पोलीस स्टेशन येथे एपीआय देविदास इंगोले,श्री.आ.ग.हायस्कूल येथे शाळेचे मुख्याध्यापक सी.सी सपकाळे,ना.ना.साहेब विष्णू हरी पाटील कन्या शाळा येथे मुख्याध्यापिका प्रमिला ठोंबरे, अल्कवी उर्दू खाजगी शाळा येथे कृ.बा.स. सदस्य सैय्यद अजगर, वीज वितरण कार्यालय येथे कार्यकारी अभियंता गोरखनाथ सपकाळे,सार्वजनिक बांधकाम विभागात उप अभियंता यांनी आपल्या कार्यालयात शिक्षक वृंद व कर्मचारी सह शहरातील मान्यवर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम सर्व नियम अटी पाळून उत्साहाने संपन्न केले. यानंतर शहरात शेखपुरा येथे असलेल्या शहीद अब्दुल हमीद यांचे स्मारक वर सालाबाद प्रमाणे यंदाही मुख्याधिकारी किशोर चव्हाण एपीआय देविदास इंगोले माजी नगराध्यक्ष व नगरसेवक राजेश वानखेडे नगरसेवक फिरोज खान पठाण डायमंड इंग्लिश मीडियम शाळेचे संस्थापक हाजी हारून सेठ अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी नगरसेविका सौ.नंदाताई लोखंडे,नगरसेवक सिद्धार्थ बडगे,न.से विश्वास चौधरी,न.से अल्लाबक्ष, शिवसेना शहरप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक तुषार बोरसे, सुरज परदेशी, शहीद अब्दुल हमीद संस्थेचे अध्यक्ष शेख मुख्तार, फिरोज खान,हुसैन भाई चायवाले अमजद पिस्तोल इत्यादी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button