Wasai

प्रजासत्ताक दिनानिमित्त पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या शाखा पालघर जिल्हा वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर

प्रजासत्ताक दिनानिमित्त पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या शाखा पालघर जिल्हा वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर

वसई,पालघर देवा तांबे

रविवार,दि.२६ जानेवारी २०२० रोजी, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था,भारत संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.देवा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.विजय चोघळा सर, राज्य उपाध्यक्षा सौ.कुमुद शहाकार व वसई तालुका युवती सचिव कु.गौरी संखे यांच्या आयोजनातून व इंफीगो आय केअर डोळ्यांचे हॉस्पिटल,पालघर* यांच्या सहकार्याने 9,ट्विन टॉवर,तिरूपती नगर,विजय सेल्सच्या बाजूला,विरार(प.) तसेच यश प्लाझा अपार्टमेंट,दयास्मृती हॉल परिसर,वीर सावरकर रोड विरार पूर्व याठिकाणी मोफत नेत्र तपासणी आरोग्य शिबिर घेण्यात आले.

सदर कार्यक्रमात वसई,विरार शहर महानगरपालिका नगरसेवक श्री.प्रफुल्लजी साने,श्री.रंजनजी पाटील,सौ.सुरेखाजी कुरकुरे,सौ.ममताजी सुमन व ऍडव्होकेट श्री.नयन जैन,सौ.अर्चना जैन,जेष्ठ पत्रकार श्री.उमाकांतजी वाघ,रीना वाघ,श्री.दत्ताजी साने,लायन श्री.बक्षी,पूनम कॉम्प्लेक्स सोसा. व यश प्लाझा सोसा.सदस्य उपस्थित होते.
यावेळी पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या पालघर जिल्हा महिला मार्गदर्शक सौ.विद्या नाईक,पालघर जिल्हा महिला पदाधिकारी सौ.मयुरी संखे,वसई तालुका महिला मार्गदर्शक सौ.मीना ठाकोर,वसई तालुका उपाध्यक्ष श्री.नरेश राणा, आदि.संस्थेचे पालघर जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button