Nashik

कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या शिक्षक नोकर भरतीत गैरव्यवहार?

कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या शिक्षक नोकर भरतीत गैरव्यवहार?

● नोकर भरती प्रक्रीया वादाच्या भोवर्‍यात

कळवण प्रतिनिधी । Kalwan : कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात वरीष्ठ अधिकार्‍यांकडून आर्थिक देवाण – घेवाणीतून शिक्षक भरतीत गैरव्यवहाऱ झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे आदिवासी प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडले असल्याचे समजले आहे.

कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातंर्गत येणार्‍या निवासी इंग्रजी माध्यमाच्या शासकीय आश्रमशाळेत सन 2021 – 22 व सन 2022 – 23 या शैक्षणिक वर्षात तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर इंग्रजी विषय शिकविणार्‍या शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहे. यात ईच्छूक उमेदवारांसाठी दि. 22 जानेवारी व दि. 2 फेब्रुवारी रोजी अनुक्रमे मुलाखतींसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

त्या अनुषंगाने 12 जागांसाठी 140 ते 150 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. कळवण प्रकल्पातंर्गत येणार्‍या कनाशी ( ता. कळवण), भिलवाड (ता. सटाणा), सराड (ता. सुरगाणा) येथे इंग्रजी माध्यमाच्या निवासी आश्रमशाळा असल्याने 2021 – 22 या शैक्षणिक वर्षाच्या दुसरे सत्र आणि 2022 – 23 या नव्या शैक्षणिक वर्षात इंग्रजी विषय शिकविण्यासाठी प्रत्येक शाळानिहाय चार इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची पदे रिक्त असल्याने सदरची पदे तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर करार पध्दतीने भरण्याचा निर्णय प्रकल्प अधिकारी विकास मीना यांनी घेतला होता.

22 जानेवारी व दि. 2 फेब्रुवारी रोजी कळवण प्रकल्प कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यात नियुक्त उमेदवारांना मासिक 13 हजार 125 रुपये मानधन स्वरुपात दिले जाणार आहे. पंरतू सदर रिक्ते पदे भरतांना आस्थापना विभागातील एका वरीष्ठ अधिकारीने यात आर्थिक देवाणघेवाण करून गैरव्यवहार केला असल्याची चर्चा कळवण शहरात होत असल्याने या भ्रष्ट अधिकार्‍यांमुळे कळवण आदीवासी प्रकल्पाचे लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे.

नोकर भरतीत वरीष्ट अधिकारीने काही उमेदवारांकडून मध्यस्थीच्या (एजंट) मदतीने देवाणघेवाण झाली असल्याची चर्चा जरी प्रकल्पात असली तरी काही उमेदवारांना प्रकल्पाबाहेर थांबवून मुलाखती घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तर काही उमेदवारांना चक्क मुलाखत घेणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आपल्या निवासस्थानी बोलवून मुलाखती न घेता आर्थिक व्यवहार केला असल्याची चर्चा आहे.

प्रकरणाबाबत काही उमेदवारांनी कळवण पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पंरतू सदर प्रकरण दाबले गेल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे काही उमेदवारांना मुलाखतीस येऊ न दिल्याने त्यांनी कळवण प्रकल्पात लेखी स्वरुपात तक्रारी दाखल केल्या आहे. ज्या आश्रमशांळेवर सुरुवातीपासुन मानधन तत्वावर अनुभवी इंग्रजी माध्यमांचे शिक्षक आहेत. त्यांनाच अगोदर प्राधान्य देण्याची लेखी तक्रार प्रकल्प कार्यालयात केली आहे. या सर्व प्रकरणात प्रकल्प अधिकारी विकास मीना काय भुमीका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागुन आहे.

कळवण आदिवासी प्रकल्पात शिक्षक नोकर भरती प्रक्रीयेमध्ये काही अंशी गोपनीय माहीती मिळाल्याने व सदर प्रकरण पोलिस ठाण्यापर्यत गेल्याने त्याचप्रमाणे तक्रारीमंध्ये तथ्य आढळून आल्याने प्रकल्प अधिकारी विकास मिना यांनी स्वतः निर्णय घेऊन मागील आठवड्यात झालेली संपुर्ण शिक्षक नोकर भरती प्रक्रीया रद्द केली आहे. नव्याने प्रकल्पाधिकारींच्या अध्यक्षतेखाली जी समीती गठीत होईल त्या समितीकडून योग्य प्रकारे नोकर भरती प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. मागील भरती प्रक्रीयेतील वरीष्ठ अधिकार्‍यांची प्रमुखपदी असलेली समिती रद्द करून स्वता प्रकल्प अधिकारी सदर नोकर भरती प्रक्रीया राबविणार आहे.

कळवण आदिवासी विकास प्रकल्पात मागील आठवड्यात झालेली निवासी इंग्रजी माध्यमांची करार पद्धतीवर शिक्षक नोकर भरती प्रक्रीया रद्द करून नविन जाहीरात काढून संपुर्ण नोकर भरती प्रक्रीया नव्याने राबविण्यात येईल. या प्रकरणात कोणतेही अधिकारी कींवा कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

विकास मिना, प्रकल्प अधिकारी, कळवण

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button