Shirpur

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात प्रख्यात “खंडोबा महाराज” यात्रा उत्सव कोरोना मुळे रद्द.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात प्रख्यात “खंडोबा महाराज” यात्रा उत्सव कोरोना मुळे रद्द.

पंकज चव्हाण शिरपूर

शिरपूर : शिरपूर “प्रख्यात खंडोबा महाराज,” यात्रा. महाआरती ने केला समारोप. शिरपूर ला दरसाल प्रमाने खंडेराव महाराज यात्रा साजरी करतात . यंदा कोरोना च्या पाश्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत व जाग्रुत देवस्थान असून या यात्रेला २६९ वर्षाचा इतिहास आहे. यात्रोत्सव रद्द झाल्यामुळे साध्या पद्धतीने महाआरती उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आली.

२७ फेब्रुवारी पासून खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव सुरू होणार होता, पण या वर्षी कोरोणाच्या पाश्वभूमीवर तो कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. यात्रोत्सवाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून मंदिरातच फक्त महाआरती चा कार्यक्रम सुरक्षित अंतर ठेवून करण्यात आला.
शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बबनराव चौधरी. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पीएसआय मुरकुटे. छगन गुजर, तालुकाध्यक्ष किशोर माळी, अरून धोबी. सतीश भोंगे महाराज, वासुदेव देवरे, नितीन गिरासे, भरत राजपूत, राजू टेलर, मंदिर संस्था नाचे अध्यक्ष कैलास धारण, संजय आसापूरे, विनायक वाघ, आदी उपस्थित होते. अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेल्या धार्मिक कार्यातून या मंदिराची स्थापना झाली असावी असे सांगितले जाते. नवसाला पावणारा देव म्हणून खंडोबा महाराज मानले जातात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button