Amalner

तालुक्यातील त्रिररत्नांचा सत्कार….

आपल्या माणसा प्रतीची आवड ,सामाजिक क्षेत्रात,निस्वार्थपणे सेवा करणारे जनहितासाठी ऊल्लेखनीय कामगिरी बजावणारे श्री.दिनेश जी सुरेश पाटील, श्री राजेंद्र पांडुरंग देसले व श्री .जितेंद्र कपूरचंद बहारे यांची उल्लेखनीय कामगिरी

अमळनेर : आपल्या माणसा प्रतीची आवड ,सामाजिक क्षेत्रात,निस्वार्थपणे सेवा करणारे जनहितासाठी ऊल्लेखनीय कामगिरी बजावणारे यांना परमेश्वर ऊदंड आयुष्य देवो व यापुढेही अशीच उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या तालुक्याची मान उंचावत रहावी अशी प्रभू चरणी प्रार्थना… आपल्या तालुक्यातील सन्माननीय मान्यवर 1)श्री.दिनेश जी सुरेश पाटील गांव दहिवद ह.मु.दुर्ग छत्तीसगड (राज्यस्तरीय मराठा समाज भुषण जीवन गौरव पुरस्कार,2)श्री राजेंद्र पांडुरंग देसले गाव दहिवद खु ह.मु. नाशिक.(राज्यस्तरीय मराठा समाज भुषण जीवन गौरव पुरस्कार , 3)श्री.जितेंद्र कपूरचंद बहारे गाव अमळनेर (कर्मवीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार) यांना अनुक्रमे वरील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .तरी वरील संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित कै.अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 25 /9/2021 रोजी सकाळी10 वाजता मराठा सेवा संघ कार्यालय गणपती मंदीराजवळ देवपुर धुळे येथे करण्यात आले तरी यावेळी माजी आमदार राजवर्धनजी कदमबांडे ,कार्याध्यक्ष विनायकराव शिंदे माजी नगरसेवक व ईतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तरी तालुक्यात वरील पुरस्कारांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button