Nandurbar

कायाकल्प पुरस्कार स्पर्धेत नंदुरबार जिल्हा रुग्णालय राज्यात तिसरे…

कायाकल्प पुरस्कार स्पर्धेत नंदुरबार जिल्हा रुग्णालय राज्यात तिसरे…

नंदुरबार दि.20: राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या ‘कायाकल्प पुरस्कार’ उपक्रमात नंदुरबार जिल्हा रुग्णालयाने चांगल्या कामगिरीत सातत्य राखत 2019-20 मध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे. नुकतेच हे पुरस्कार जाहीर करण्यात आले.

शासकीय रुग्णालयातील स्वच्छता व व्यवस्थापनावर आधारीत मुल्यांकन करून या पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. नाशिक जिल्हा रुग्णालय 97.55 टक्के गुणांसह प्रथम, मालेगाव शासकीय रुग्णालय 91.67 टक्के गुणांसह दुसऱ्या आणि नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालय 91.15 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

यापूर्वी 2015-16 मध्ये जिल्हा रुग्णालयाने दुसरा तर त्यानंतर कामगिरीत सातत्य राखत 2016-17 आणि 2018-19 मध्ये तिसरा पुरस्कार मिळविला आहे.
जाहीर झालेल्या पुरस्कारात उपजिल्हा रुग्णालय गटात नवापूरने आणि ग्रामीण रुग्णालय खोंडामळीचा पुरस्काराच्या यादीत समावेश आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्र गटात लहान शहादा, नटावद, चिंचपाडा आणि कहाटूळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयाला जाहीर झालेला पुरस्कार हा अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविणारा असून कोविड संकटात आणखी उत्तम काम करण्याची ऊर्जा त्यामुळे मिळेल. हे सर्वांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांचे यश आहे, अशी प्रतिक्रीया जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button