Nimbhora

ना.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी ओबीसी सेल तर्फे शेतकऱ्यांसाठी यांत्रिकीकरणाची नोंदणी.

ना.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी ओबीसी सेल तर्फे शेतकऱ्यांसाठी यांत्रिकीकरणाची नोंदणी.


निंभोरा : येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवस सप्ताहानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल,रावेर तर्फे शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या यांत्रिकीकरण व ठिंबक सिंचन योजनेचे ऑनलाईन अनुदान योजनेसाठी अर्ज भरून देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेल चे तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे,माजी पं स सदस्य प्रमोद रोझोतकर, गुणवंत भंगाळे, रवींद्र भोगे,गिरीश नेहेते,मोहन भंगाळे,सुरेश भंगाळे,योगेश कोळंबे, गंभीर कोळंबे,राजीव भोगे,खिर्डी येथील नीरज शिरनामे, पराग नेहेते,कांडवेलचे रवींद्र पाटील,ओबीसी सेलचे प्रसिद्धी प्रमुख हर्षल ठाकरे,तालुका संघटक अर्षद पिंजारी,बलवाडीचे सुशील तायडे,ग्रा पं सदस्य शेख दिलशाद,संजय नेहेते,हेमंत पवार,यांसह आदी शेतकरी उपस्थित होते.या नोंदणी अभियानामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना या योजनेची माहिती होऊन राज्य सरकारच्या विविध योजना ना अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button