Amalner

दिव्यांगांच्या युनिट १ व २ चे कार्ड व लग्न न झालेल्या दिव्यांग व्यकतींच्या रेशनकार्डला अंतोदय यादीत समाविष्ट करा..राष्ट्रीय विकलांग पार्टीचे प्रशासनाला निवेदन..

दिव्यांगांच्या युनिट १ व २ चे कार्ड व लग्न न झालेल्या दिव्यांग व्यकतींच्या रेशनकार्डला अंतोदय यादीत समाविष्ट करा..राष्ट्रीय विकलांग पार्टीचे प्रशासनाला निवेदन..

अमळनेर तालुक्यातील विकलांग लोकांची आजही दैनंदिन परिस्थिती हा लेके ची असून काही विकलांग लोकांकडे पैसे नसल्यामुळे ते आपले दैनंदिन गरज भागवू शकत नाही तसेच त त्यांचे खाण्यापिण्याचे अत्यंत हाल अपेष्टा होत असून शासनाने दिव्यांग व्यक्तींना दिलेले रेशन कार्ड एक व दोन युनिटचे असून ते रेशन कार्ड अंतोदय यादीत समाविष्ट करण्यात यावे तसेच दिव्यांग व्यक्तीं ज्याचे लग्न झालेले नसून आशा दिव्यांग बांधवांना यादीत समाविष्ट करण्यात यावे ही नम्र विनंती तसेच पुरवठा अधिकारी व तिथले कर्मचारी हे आम्हाला माणुसकीची वागणूक देता आमच्या मानस ठेच पोहोचणे असे संभाषण करून आम्हाला शारीरिक व मानसिक त्रास देतात तरी आशा अधिकाऱ्यांवर योग्य ती चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाही करण्यात यावी अशी विनंती राष्ट्रीय विकलांग पार्टी जळगाव यांच्या अमळनेर शाखेने केली आहे.

निवेदन देताना राष्ट्रीय विकलांग पार्टी चे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष दिपक सुरेश पाटील तालुका अध्यक्ष बिरजू छगन चौधरी शहराध्यक्ष अमोल मधुकर पाटील शहर उपाध्यक्ष करीम उसेन बागवान, शहर सचिव राकेश पाटील, महिला मोर्चा सविता साळुंखे आणि ग्रामीण भागातील काही दिव्यांग व शहरातील सर्व दिव्यांग बांधव उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button