Pune

पुणे मेट्रोच्या 96 जागांसाठी पद भरती…!ही आहे अंतिम तारीख आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक…

पुणे मेट्रोच्या 96 जागांसाठी पद भरती…!ही आहे अंतिम तारीख आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक…

पुणे मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या तब्बल 96 जागांसाठी मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य प्रकल्प, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ स्थानक नियंत्रक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञ, खाते सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 ही आहे.

या पदांसाठी भरती

अतिरिक्त मुख्य प्रकल्प (Additional Chief Project)
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (Senior Deputy General Manager)
उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager)
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)
वरिष्ठ स्थानक नियंत्रक (Senior Station Controller)
वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer)
विभाग अभियंता (Section Engineer)
कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)
वरिष्ठ तंत्रज्ञ (Senior Technician)
खाते सहाय्यक (Account Assistant)

शैक्षणिक पात्रता..
अतिरिक्त मुख्य प्रकल्प (Additional Chief Project) – इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये पूर्ण वेळ B.E. / बी.टेक. पदवी.
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (Senior Deputy General Manager) – इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलमध्ये पूर्ण वेळ B.E. / बी.टेक. पदवी.
उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) – इलेक्ट्रिकल, सिव्हिल किंवा मेकॅनिकलमध्ये पूर्ण वेळ B.E. / बी.टेक. पदवी.
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) – इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये पूर्ण वेळ B.E. / बी.टेक. पदवी.
वरिष्ठ स्थानक नियंत्रक (Senior Station Controller) – कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक.
वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer) – पूर्ण वेळ B.E. / बी.टेक. पदवी आवश्यक.
विभाग अभियंता (Section Engineer) – इलेक्ट्रिकलमध्ये पूर्ण वेळ B.E. / बी.टेक. पदवी.
कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) – इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलमध्ये पूर्ण वेळ B.E. / बी.टेक. पदवी.
वरिष्ठ तंत्रज्ञ (Senior Technician) – ITI (NCVT / SCVT) मध्ये शिक्षण आवश्यक.
खाते सहाय्यक (Account Assistant) – ITI (NCVT / SCVT) मध्ये शिक्षण आवश्यक.

असा असेल पगार..
अतिरिक्त मुख्य प्रकल्प (Additional Chief Project) – 1,00,000 – 2,60,000/- रुपये प्रतिमहिना
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (Senior Deputy General Manager) – 80,000 – 2,20,000/- रुपये प्रतिमहिना
उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) – 70,000 – 2,00,000/- रुपये प्रतिमहिना
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) – 50,000 – 1,60,000/- रुपये प्रतिमहिना
वरिष्ठ स्थानक नियंत्रक (Senior Station Controller) – 40,000 – 1,25,000/- रुपये प्रतिमहिना
वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer) – 46,000 – 1,45,000/- रुपये प्रतिमहिना
विभाग अभियंता (Section Engineer) – .40,000 – 1,25,000/- रुपये प्रतिमहिना
कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) – 33,000 – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना
वरिष्ठ तंत्रज्ञ (Senior Technician) – 33,000 – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना
खाते सहाय्यक (Account Assistant) – 25,000 – 80,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर 2021
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mahametro.org/pdf/Apply_MahaMetroPune_HR_06_2021.pdf या लिंकवर क्लिक करा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button