Jalgaon

जळगांव पोलिस दलात 128 पदांसाठी भरती ; 9 ऑक्टोबर ला परीक्षा – डॉ. प्रविण मुंढे

जळगांव पोलिस दलात 128 पदांसाठी भरती ; 9 ऑक्टोबर ला परीक्षा – डॉ. प्रविण मुंढे

जळगांव नाशिक परिक्षेत्रातील जळगांव जिल्हा पोलिस दलात 128 पदांसाठी पोलिस शिपाई भरती 2019 ची प्रक्रिया सुरू झाली असून 9 ऑक्टोबर 2021 रोजी जळगांव शहर व भुसावळ येथील 68 केंद्रांवर 21691 उमेदवारांची 100 गुणांची बहुपर्यायी लेखी परीक्षा लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ज्या उमेदवारांनी जळगांव जिल्हा पोलिस शिपाई भरती 2019 मध्ये ऑनलाईन आवेदन अर्ज भरलेले आहेत त्यांना ई मेल तसेच मोबाईल वर sms पाठविले असून त्यांनी त्या लिंक द्वारे परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करावे असे आवाहन केले आहे.सर्व नियमांना अनुसरून परीक्षा संपन्न होईल.कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण उमेदवाराला परीक्षा खोलीत नेता येणार नाही. सर्वांनी आवश्यक त्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button