Amalner

Amalner: अमळनेर युवा परिट धोबी मंडळाच्या अध्यक्ष पदी रविंद्र जाधव उपाध्यक्षपदी अविनाश जाधव व उमेश वाल्हे तर सचिव पदी विजय वाघ

अमळनेर युवा परिट धोबी मंडळाच्या अध्यक्ष पदी रविंद्र जाधव उपाध्यक्षपदी अविनाश जाधव व उमेश वाल्हे तर सचिव पदी विजय वाघ अमळनेर – येथील युवा परिट धोबी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा काशिनाथ बळीराम खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडुन यावेळी सर्वांच्या संमतीने मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
जुना टाऊन हॉल येथे ही सभा पार पडून नवीन कार्यकारिणीत क्रियाशील व सामाजिक वलय असणाऱ्या मंडळींना संधी देण्यात आली आहे,यावेळी मंचावर माजी अध्यक्ष अमृत जाधव,रविंद्र जाधव,मोतीलाल जाधव,विजय वाघ उपस्थित होते.शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमाचे पालन करुन ही सभा संपन्न झाली.यावेळी मागील कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने सदर सर्वसाधारण सभेत सन 2022 – 27 या पंचवार्षिकसाठी सर्वानुमते नुतन
कार्यकारी मंडळातील संचालक मंडळाची निवड करण्यात आली ती पुढीलप्रमाणे.असे आहे नवनिर्वाचित कार्यकारिणी मंडळअध्यक्ष : -रविंद्र साहेबराव जाधव ,
उपाध्यक्ष :- अविनाश दगडु जाधव ,
उपाध्यक्ष :- उमेश उत्तम वाल्हे ,
सचिव:- विजय शिवाजी वाघ,
सहसचिव:- अनिल भिका जाधव ,खजिनदार :- मोतीलाल लालचंद जाधव ,
कार्याध्यक्ष :- विनोद यशवंत जाधव,
कार्यकारी सदस्य:- दिपक उखर्डू वाल्हे , गणेश विक्रम नेरकर , अनिल अशोक वाघ ,मधुकर सोनु निंबाळकर ,मनोज साहेबराव निकुंभ, गिरीश गोरख चित्ते , भरत रमेश जाधव, गंगाराम शंकर वाल्हे आदींची निवड करण्यात आली.
दरम्यान यावेळी गेल्या दहा वर्षांत संचालक मंडळाने केलेल्या कामाचा आढावा घेऊन सध्याच्या परिस्थितीत सुरु असलेल्या कामांना पुर्णत्वास नेण्यासाठी चर्चा करण्यात आली.
तसेच समाजबांधवांना लग्न कार्य व हळदी चे आमंत्रण संधर्भात सोशल मिडिया ( व्हाट्सअँप ) च्या माध्यमातून मिळालेले पत्रिका हेच आग्रहाचे आमंत्रण समजुन स्विकार करावा व सदर कार्यक्रमास ( लग्न कार्यास)) उपस्थित रहावे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.नूतन कार्यकारीनीचा सर्व उपस्थित मान्यवरांनी स्वागत व सत्कार केला.सूत्रसंचालन विनोद जाधव यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button