Rawer

रावेर तहसिल कार्यालय कोरोना निधीच्या प्रतीक्षेत मागील वर्षी चां मिळालेला निधी रुग्ण सुविधांवर खर्च-तहसिलदार उषाराणी देवगुणे

रावेर तहसिल कार्यालय कोरोना निधीच्या प्रतीक्षेत
मागील वर्षी चां मिळालेला निधी रुग्ण सुविधांवर खर्च-तहसिलदार उषाराणी देवगुणे
मुबारक तडवी रावेर
रावेर : कोरोना व्हायरस संदर्भात शासनाने गतवर्षी रावेर तहसील प्रशासनाला कोरोना निर्मुलन रुग्ण सोई सुविधा साठी उपाययोजना उपलब्धतेकामी खर्च करायला 16 लाख रुपये दिले होते . यावर्षी सुध्दा कोरोना व्हायरसची दुसरी लाट असून लॉकडाऊन लावण्यात आले आहे परंतु यावर्षी शासना कडून कोरोना संदर्भात निधी मिळालेला नाही . गतवर्षी रावेर तहसील प्रशासनाला कोरोना संदर्भात खर्च करण्यासाठी 16 लाख रुपये आले होते . यामध्ये रावेर तहसील प्रशासनाने रुग्णवाहिका भाडे , डिझेल , जेवण व इतर बाबींवर 16 लाख रुपये खर्च केले होते परंतु यावर्षीदेखील कोरोनाची दुसरी लाट असून तहसील प्रशासनाला कोरोना संदर्भात कोणताही निधी अद्याप मिळालेला नाही
मागील वर्षाचा निधी पूर्ण खर्च : तहसीलदार गतवर्षी शासनाकडून मिळालेला 16 लाख रुपये पूर्ण खर्च रुग्णवाहिका भाडे , डिझेल , जेवण व इतर बाबींवर खर्च झाला आहे . यावर्षी अद्याप कोरोना संदर्भात निधी मिळाला नसल्याचे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी सांगितले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button