Maharashtra

रावेर गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांना चुकी करून माफी मागण्याची सवय : मात्र प्रतिमा अनादर प्रकरण न्याया पासून वंचित?

रावेर गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांना चुकी करून माफी मागण्याची सवय : मात्र प्रतिमा अनादर प्रकरण न्याया पासून वंचित?

युसूफ शाह सावदा

“प्रथम आदर्श शिक्षक पुरस्कार प्रस्ताव प्रकरणी पंचायत समिती सभागृहांमध्ये आढावा बैठकीत मागितली माफी.यानंतर महापुरुषांच्या प्रतिमा अनादर प्रकरणी देखील पुढे असे होणार नाही अशी लेखी हमी पंचायत राज समितीकडे देवून २० दिवसात या बेजबाबदार गटशिक्षणाधिकारी यांनी दुसऱ्यांदा मागितली माफी. म्हणून पूज्य साने गुरुजी, मदर टेरेसा यांच्या सारखे महापुरुष अवमान प्रकरण देखील न्याया पासून वंचित दिसून येत आहे.!”

सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर पंचायत समिती येथे शिक्षण विभागास लाभलेले गट शिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांना गंभीर चुका केल्याबद्दल २० दिवसात दोन वेळा माफी मागावी लागली. यावरून त्यांची कर्तव्यदक्षतावर प्रश्नचिन्ह उभे झालेले आहे. सबब त्यांचे कार्यकाळातील संपूर्ण कारभाराची तात्काळ कर्तव्यदक्ष संबंधित वरिष्ठ अधिकार्‍याकडून चौकशी झाल्यास भरपूर अनागोंदी व चुका समोर येतील. असे सुज्ञ नागरिकाकडून बोलले जात आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कार बाबत जि. प. उर्दू मुलांची शाळा नं.१ रावेर येथील महिला उपशिक्षकचे प्रस्ताव पंचायत समिती सभापती व सदस्यांना थेट अंधारात ठेवून जिल्हा परिषद जळगांव येथे परस्पर पाठवल्यामुळे दि.९ सप्टेंबर रोजी रावेर पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठकीत गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांना माफी मागावी लागली. तेव्हापासून हा आदर्श शिक्षक पुरस्कार संपूर्ण जिल्ह्यात बहुचर्चित झालेला असून याप्रकरणी काही आर्थिक हीत संबंध सह सदरील महिला उपशिक्षक यांना ३ आपत्य असल्याचा प्रकार सुद्धा उघडकीस आलेला आहे. मात्र जिल्हा परिषद शिक्षण विभाग कुंभकर्णी झोप घेत असून या प्रकरणी कारवाई करणार तरी कोण हा प्रश्न उपस्थित झालेला आहे.

तसेच पंचायत राज समिती (पीआरसी) दौरा येणार असल्याची अधिकृत माहिती असताना देखील रावेर गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमेचा अनादर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सदर कार्यालयात अनेक दिवसापासून साने गुरुजीची प्रतिमा केव्हाही कोसळतील अशा अवस्थेत भीतीवर होती. तसेच विद्यार्थ्यांसाठी आलेली पुस्तके अस्ताव्यस्त अवस्थेत ठेवलेली होती.

याविषयी पंचायत राज समिती कडे तक्रार हीसुद्धा झाल्या वृत्तपत्रात पुराव्यासहित बातम्या सुद्धा प्रकाशित झाल्या याप्रकरणी पंचायत राज समितीचे अधिकाऱ्यांना सुद्धा त्यावेळी फाईलावर घेण्यात आले असता लोकांना कारवाई करण्याचे आश्वासन समितीकडून देण्यात आले. मात्र यानंतर पुढे असे होणार नाही. अशी लेखी हमी गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांनी पंचायत राज समिती कडे दिल्याचे समिती गटप्रमुख अनिल भाईदास पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.मात्र यापूर्वी महापुरुषांचे अनादर करणाऱ्या अनेक राजकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे. मात्र गेल्या तीन दिवसात असे काय घडले की, कठोर कारवाई एवजी बेजबाबदार गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांची लेखी हमी पुढे साने गुरुजी सारख्या महापुरुषांच्या प्रतिमेचे अनादर पंचायत राज समितीचे अधिकाऱ्यांसह जिल्हा शिक्षण विभागा यांना काहीच वाटत नाही. म्हणून तालुक्यातील प्रचंड संतापाचे वातावरण आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button