Rawer

रावेर येथील पत्रकार शेख शरीफ यांना हैदराबाद येथे “उत्कृष्ट पत्रकारिता” या पुरस्काराने केले सन्मानित

रावेर येथील पत्रकार शेख शरीफ यांना हैदराबाद येथे “उत्कृष्ट पत्रकारिता” या पुरस्काराने केले सन्मानित

रावेर/मुबारक तडवी

” कोरोना महामारीच्या कालखंडात संपूर्ण जगात सह आपल्या देशात फक्त वैद्यकीय सेवा व त्याच्याशी निगडित सेवा वगळता इतर सर्व कारोबार व्यवस्था ठप्प झालेली होती. मात्र याचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला होता. याला घेऊन सरकार सह शिक्षक पालक वर्ग विद्यार्थ्यांच्या होणारे शैक्षणिक नुकसान बाबत मोठ्या चिंतेत होता. परिणामी सध्या समाजातील काही जबाबदार व जागृत लोकांनी नवीन शैक्षणिक वर्षापासून आपापल्या क्षेत्रात विद्यार्थ्यांचे हिताकरिता भविष्य शैक्षणिक जनजागृती करण्याचे उत्कृष्ट कार्य मध्ये “तालीम हमारी हर हाल मे जारी”या ब्रीद वाक्य ला अनुसरून ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोशियन महाराष्ट्र तर्फे यशस्वीरित्या राबवण्यात आलेल्या १५ दिवसाच्या राज्यव्यापी शैक्षणिक जागरूकता अभियानात रावेर येथील पत्रकार शेख शरीफ यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन सदरील असोशियन तर्फे त्यांना हैदराबाद येथे कार्यक्रमात उत्कृष्ट पत्रकारिता या पुरस्कारांनी नुकतेच सन्मानित करण्यात आले.”
शिक्षक तथा पत्रकाराने त्याचे कार्यक्षेत्रात विद्यार्थ्यांच्या हिताकरिता शैक्षणिक जागृती अभियानात उत्तम व कौतुकास्पद कामगिरी केल्याने त्याचे या कार्याची दखल घेऊन ऑल इंडिया टीचर्स असोसिएशन तर्फे नुकतेच हैदराबाद येथे घेण्यात आलेले एका मोठ्या कार्यक्रमात उत्कृष्ट पत्रकारिता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

अल हुदा स्कूल पहाडी शरीफ हैदराबाद येथे ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन (आयटा), महाराष्ट्राची २ दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली. त्यात
रावेर येथील दैनिक शब्दमतचे तालुका प्रतिनिधी शेख शरीफ शेख सलीम यांना
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी सदरील असोसिएशनचे अखिल भारतीय अध्यक्ष शेख अब्दुल रहीम , महाराष्ट्र राज्याध्यक्ष सय्यद शरीफ , राज्य सचिव शेख मुहम्मद अतिक , सह केंद्रीय सचिव अस्लम फेरोज , माजी राज्याध्यक्ष अब्दुल जलील ,यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. यावेळी राज्य सल्लागार समितीचे स्थानिक पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष, सचिव, सदस्य देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यामुळे पत्रकार शेख शरीफ यांचे रावेर तालुक्यातील पत्रकार बांधवा व सर्व मित्रपरिवार आणि त्यांच्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून कौतुक देखील करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button