Bhadgaw

तरतुदींचे पालन न केल्यास रेशन दुकानदाराचे परवाने रद्द करणार ; भडगाव तहसीलदार सागर ढवळे रेशनदुकानदारांची घेतली बैठक.

तरतुदींचे पालन न केल्यास रेशन दुकानदाराचे परवाने रद्द करणार ; भडगाव तहसीलदार सागर ढवळे रेशनदुकानदारांची घेतली बैठक.
भडगांव : तालुक्यातील काही रेशन दुकानातील काळाबाजारला आळा बसविण्यासाठी दुकानदारानी बाहेर दर्शनी भागी “माहिती फलक” व माल घेतल्याची पावती देणे. शिल्लक माल तपशील. धान्ये दिलेल्या ग्राहकांची यादी लावणे. अशा तरतुदी चे पालन करण्यासाठी विजय पाटील यांचेसह काहींनी तक्रार दाखल केली होती.
सदर तक्रारीची तहसीलदार सागर ढवळे यानी दखल घेऊन सर्व रेशन दुकानदार यांची मिटीग घेऊन वरील तरंतुदींचे पालन करण्याचे कायदेशीर आदेश दिले आहेत. संबंधितांनी माहीती फलक लावणे, पावती देणे, वाटप धारकांची यादी सह माहीती नागरीकांना वाचता येईल अश्या दर्शनी भागी लावण्याची सुचना व आदेश दिले आहेत.
जे रेशन दुकानदार तरतुदींचे पालन केले नाही. त्याचे शासन परवाने रद्द करण्याची ताकीद दिली आहे. राज्ये, केंद्रीय पंतप्रधान गरीब कल्याण योजना मध्ये भ्रष्टाचार केला असेल किवा कुणाची तक्रार आल्यास सबंध्दीतावर गुंन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
काही रेशन दुकानदारांनी ग्राहकांना मोफत रेशन देण्यास नकार दिल्या प्रकरणी तक्रार तहसीलदार यांचेकडे दाखल करुन वरील शासन तरंतुदींचे पालन करण्याची मागणी केली होती. सर्व रेशनिंग धारकाचे मोफत धान्ये वाटपाची चौकशी -तहसिलदार सह तक्रारदार व समीती – मालाची आर. सी. नंबर रेशन दुकानाची पडताळणी करीत आहेत. तसेच मागील १०/१२ वर्षा पासुन तत्कालीन तहसीलदार यांनी या प्रकरणाची दखलच घेतली नव्हती. सदर तरतुचे पालन झाल्यास ४० टक्के भ्रष्टाचारास आळा बसण्याची शक्यता आहे. आज भडगाव तहसिलदार सागर ढवळे यांनी शहरातील २ रेशन दुकांनांना अचानक भेट देउन पाहणी केली. रजिष्टर आदि चेक करुन संबंधित दुकानदारांना सुचनाही केल्या अशी माहीती तहसिलदार सागर ढवळे यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button