Rawer

राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे युवा अवस्थेला वळण देण्याचे व राष्ट्रीय एकात्मता टिकवण्याचे शिबिर दिलशाद खान सर यांचे प्रतिपादन.

राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे युवा अवस्थेला वळण देण्याचे व राष्ट्रीय एकात्मता टिकवण्याचे शिबिर..दिलशाद खान

संदिप कोळी
निंभोरा बु ,ता.रावेर येथून जवळच बलवाडी येथे ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाचे विशेष शिबिर दत्तक ग्राम बलवाडी ता.रावेर येथील जि.प.मराठी शाळेत सुरू असून रासेयो एककाचे विशेष शिबिरात दिलशाद खान सर यांनी राष्ट्रीय एकात्मता या विषयावर आपल्या भाषणातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात तरुण वयाला योग्य वळन देनारे शिबिर आहे त्याचा पुरेपुर फायदा घ्या. भाग्यवंत विद्यार्थी च या शिबिरात सहभागी होतात. राष्ट्राची एकात्मता टिकवण्यासाठी असे शिबिरे होने गरजेचे आहे, असे सांगून त्यांनि त्यांच्या शेर शायरीने सर्व विद्यार्थ्यांना मोहून टाकले.
तर प्राध्यापक दिलीप सोनवणे यांनिही शेर शायरी, कविता व अनुभव कथन करत अशक्य या जगात काहिच नाही प्रयत्न करा यश नक्की मिळेल.
येथे असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी सुप्त कला गुण आहेत त्यांना वावदेणारे हे हक्काचे व्यासपीठ आहे असे सांगून विद्यार्थ्यांन मध्ये आत्मविश्वास जागृत केला.
*या कार्यक्रमाचे विषेश म्हणजे व्यासपीठावर उपस्थित निंभोरा ग्रा.प.सदस्य दिलशाद खान सर, प्रा.दिलीप सोनवणे, बलवाडी उपसरपंच विक्रम तायडे, बलवाडी ग्रामविकास अधिकारी प्रकाश तायडे हे सर्व ऐनपूर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी स्वतःच्या उदाहरणांनी विद्यार्थ्यांनमध्ये आत्मविश्वास जागृत केला.*
व्यासपीठावर महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.जे.पी.नेहेते सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.डी.बी. पाटील, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सौ.रेखा पाटील, वरीष्ट लिपीक श्री.गोपाळ महाजन, बलवाडी उपसरपंच विक्रम तायडे, ग्रामविकास अधिकारी प्रकाश तायडे, प्रा.संकेत चौधरी, नितीन महाजन हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अंकीता शिरनामे, साक्षी कोळी व आभार अल्ताब पटेल यांनी केले.

फोटोत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना दिलशाद खान सर, व्यासपीठावर प्रा.गोपाळ महाजन, प्रा.डॉ.जे.पी.नेहेते, प्रा.डॉ.डी.बी.पाटील, प्रा.डॉ.सौ.रेखा पाटील, ग्रामसेवक प्रकाश तायडे, प्रा.दिलीप सोनवणे, उपसरपंच विक्रम तायडे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button