Mumbai

राणेंची धमकी आणि संजयाची वाढली सुरक्षा..! तोंडी फाईट आणि सिक्युरिटी टाईट..!

राणेंची धमकी आणि संजयाची वाढली सुरक्षा..! तोंडी फाईट आणि सिक्युरिटी टाईट..!

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणें यांच्यातील नोक झोक वादा नंतर भाजप नेते निलेश राणे यांनी करेक्ट कार्यक्रम करण्याची दिलेली धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राऊत यांच्या दिमतीला सहा शस्त्रधारी जवान देण्यात आले असून राऊत यांच घर छावणी दिसत आहे.

नारायण राणे आणि शिवसेनेमध्ये टोकाचा संघर्ष सुरू आहे.नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या विधाना नंतर हे वाद विकोप्यास गेले आहेत. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी संजय राऊत यांचा योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम लावण्याची धमकी दिली होती. परिणामी शिवसेना संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राऊत यांचे घर आणि सामना कार्यालयातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

डीसीपी प्रशांत कदम संजय राऊत यांच्या भेटीसाठी पोहोचले.तसेच कदम यांनी राऊत यांना सुरक्षेच्या अनुषंगाने काही सूचना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. आता राऊत यांच्या ताफ्यात दोन अतिरिक्त एसपीयूचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यांना स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या एकूण 6 शस्त्रधारी जवानांची सुरक्षा देण्यात आली आहे. या शिवाय 12 पोलीस जवानांसहीत साध्या वर्दीतील पोलिसांचा समावेशही त्यांच्या सुरक्षेत करण्यात आला आहे. राऊत यांना सध्या वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.संजय राऊत यांचे बंधू आणि शिवसेना आमदार सुनिल राऊत यांच्याही सुरक्षेत करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

काय आहे विषय..

जन आशीर्वाद यात्रा काढण्यापूर्वी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली खेचण्याची भाषा केली होती. त्यामुळे राणेंविरोधात शिवसैनिकांमध्ये संताप उसळला होता. नाशिक, पुणे आणि महाडमध्ये राणेंविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर राणेंना अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना जामीनही मिळाला होता. मात्र, या दरम्यान, राणे आणि राऊत यांच्या दरम्यान शाब्दिक चकमकी झडत होत्या.धमकी देण्यात आली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button