Nanded

वंचीत बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंद च्या हाकेला ला मुखेड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद तर कडकडीत बंद

वंचीत बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंद च्या हाकेला ला मुखेड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद तर कडकडीत बंद

नांदेड प्रतिनिधी :- वैभव घाटे

वंचीत बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी दि.24 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद चे आवाहन केले होते. या बंद ला मुखेड शहरात व तालुक्यातील सावरगाव पीर, जांब,बारहाळी,बेटमोगरा विविध ठिकाणी सर्व बाजार पेठ व वाहतुक सेवा बंद ठेवून सी.ए. ए.एन.आर.सी, एन.पी.आर. या कायद्याचा विरोध करत “हक हमारी आझादी, जान से प्यारी आझादी, आझाद देश से आझादी,एन.आर.सी.से आझादी,सी.ए.ए.से आझादी,एन.पी.आर.से आझादी अशा घोषवाक्ये सह भारतीय संविधानाचा विजय असो असे नारे देत अतिशय शांततेत मुखेड शहरात बंद पाळण्यात आला. सद्यस्थितीत देशात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे,मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे, दिवसा ढवळ्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ,बलात्कार व लैंगिक अत्याचार वाढत चालले आहे या मुद्यावर चर्चा न करता नव्याने देशात सी.ए.ए.एन.आर.सी.सारखे काळे कायदे लादण्याचा डाव मोदी, शहा सरकार करत असल्याचे भरीपचे मुखेड तालुकाध्यक्ष संजय भारदे यावेळी बोलताना म्हणाले, संविधान विरोधी कृत्य जाणीवपूर्वक सत्ताधारी, भाजपा सरकार व विरोधक वर्ग करत आहे. असे रिपब्लिकन सेनेचे युवा प्रवक्ते सिद्धार्थ कांबळे बेळीकर यांनी यावेळी बोलताना आपले मत व्यक्त केले.हा बंद देशाच्या बुडालेल्या अर्थव्यवस्थेविषयी झोपलेल्या सरकरला जाग आणण्यासाठी आणि बुडलेल्या अर्थव्यवस्थेविषयी जागरूक नसलेल्या सर्वसामान्य भारतीय जनतेला जागृत करण्यासाठी आहे.

वंचीत बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंद च्या हाकेला ला मुखेड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद तर कडकडीत बंददेशात विद्यमान सरकारकडून जाणीवपूर्वक करू घातलेल्या प्रचंड अशा शासकीय संस्थांच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.सी.ए.ए., एन.आर.सी.एन. पी. आर. अशा राष्ट्रविभाजनकारी,राष्ट्रविरोधी कायद्याच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे.सद्य स्थितीत देशाची अर्थअवस्था व्हेंटिलेटर वरती गेली आहे तिला जबाबदार नोटबंदी आणि विद्यमान सरकारचे आर्थिक धोरणे,अर्थव्यवस्थेबद्दल घेतलेले चुकीचे निर्णय आहेत.देशातील प्रमुख बँका सध्या तोट्यात गेल्या आहेत आणि याचा इफेक्ट हा छोट्या-मोठ्या बँकांवर्ती मोठ्या प्रमाणात पडत आहेत आणि काही छोट्या बँका बंद सुद्धा पडत आहेत.आज सरकारकडे कसल्याच प्रकारचा राखिव पैसा (Deposit Money) उपलब्ध नाही जो की देशाच्या समस्यांवर्ती उपयोगात येईल.काही दिवसांपूर्वीच सरकारने RBI कडून तब्बल 1.76 लाख करोड रुपये एवढा निधी घेतला होता तो सर्व निधी या सरकारने संपविला आहे आणि आता पुन्हा यांनी RBI कडे 45 हजार करोड रुपयांची मागणी केली आहे यावरून आम्हाला समजायला हवंय की हे सरकार आर्थिक पटलावर सपशेल अपयशी ठरल आहे या सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली आहे.आशा अवस्थेत देशाला चालविण्यासाठीचा जो खर्च लागतो आज तो विद्यमान सरकारकडे उपलब्ध नाही.एवढी भयाण आर्थिक दिवाळखोरी आणि परिस्थिती या सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची केली आहे.सबंध SC,ST,OBC,Minority समाजाला देशाच्या नोकरशाहीत,कर्मचारी वर्गात स्थान मिळाले ते संविधानिक आरक्षणामुळे मग ते क्षेत्र रेल्वेचे असो की सरकारी कारखाने असोत की मग इतर कोणतेही शासकीय ठिकाण किंवा शासकीय संस्था असो.पण विद्यमान सरकार या सर्वच शासकीय संस्थांचे खाजगीकरण मोठ्या प्रमाणात करत आहे.खाजगीकरण होण्याचा परिणाम म्हणजे देशात लोकसंख्येने 95% असलेल्या आणि आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या SC,ST,OBC,EBC,Minority समाजाच्या नौकऱ्यांवर गदा आणला जाईल.आणि या 95% वर्गाला कुठल्याही प्रकारच्या शासकीय नौकर्यांमध्ये स्थान मिळणार नाही SC,ST,OBC,EBC आणि Minority या वर्गाकडे स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी प्रमुख कोणताही व्यवसाय नाही.आरक्षणामुळे या वर्गातील तरुणांना लाखो सरकारी नौकाऱ्या भेटायच्या पण आता होत असलेल्या खाजगीकरनामुळे या नौकऱ्या रद्द होतील.या अतिशय गंभीर मुद्द्यावर सुद्धा देशात चर्चा होताना दिसत नाही म्हणूनच याविषयी सुद्धा सर्वसामान्य SC,ST,OBC,EBC आणि Minority समाजात याविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठीच हा 24 तारखेचा बंद आयोजित केला गेला होता.

या मुखेड बंद मध्ये वंचित बहुजन आघाडी शाखा मुखेड यांच्या वतीने
मुखेड शहर व तालक्यात विविध ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला.
सी.ए.ए.व एन.आर.सी.सरकारच्या आर्थिक धोरणा विरोधात मुखेड बंद मध्ये प्रमुख भारिप बहुजन महासंघाचे अॅड.संजय भारदे,
प्रा.यशवंत कांबळे,डी.पी.वाघमारे,डी डी वाघमारे,गौतम गावंडे,पाशाभाई शेख,मिलिंद गायकवाड,राहुल कांबळे आखरगेकर
संतोष कांबळे आखरगेकर,संदीप कांबळे बावलगावकर, भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष गंगाधर सोंडारे
पत्रकार भारत सोनकांबळे
बबलू शेख,गायक रवीराज भद्रे
सुरेंद्र भद्रे,गौस पठाण,बबलू मुला,रोऊन शेख,शरीफ मनीयार,आजही सौदागर,सिद्धार्थ कांबळे बेळीकर,रवी सोनकांबळे,सलीम पिंजारी,सतीश उंद्रीकर,नागराज चौंडीकर,मनोज बनसोडे,चांदोबा टोम्पे,मोसीन शेख
पप्पू सोनकांबळे,भैय्यासाहेब कांबळे,वसंत सोनकांबळे,अनिकेत कांबळे,आशुतोष कांबळे,रवींद्र ढवळे,वाघमारे जयपाल,शादुल होनवडजकर,अरबाज बागवान
डी जे ढवळे,रवी सोनकांबळे कलाळीकर
विनायक सोनकांबळे,बालाजी गवले
संभाजी देवकते आदींची उपस्थिती होती.
व मुखेड मध्ये कडकडीत बंद पाळून बंद शांततेत पार पडला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button