Pune

राजवर्धन पाटील आले मदतीला; खोरोची गावच्या नगरे कुटुंबीयांना केली मदत

राजवर्धन पाटील आले मदतीला; खोरोची गावच्या नगरे कुटुंबीयांना केली मदत

दत्ता पारेकर पुणे

पुणे : खोरोची येथील शंकरराव नगरे यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सर्व संसारोपयोगी साहित्य भस्मसात झाले. त्यामुळे संकटात सापडलेल्या नगरे कुटुंबीयांना निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी मदत केली. सदरची मदत नगरे कुटुंबीयांकडे स्थानिक कार्यकर्त्यांनी सुपूर्त केली.
शंकरराव नगरे यांच्या घराला सोमवारी मध्यरात्री आग लागली. मासेमारी करून शंकर नगरे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मध्यरात्रीच्या वेळी आग लागल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य बाहेर न काढता आल्याने आगीत जळून गेले.
त्यामुळे राजवर्धन पाटील यांच्याकडून नगरे कुटुंबियांना आधार देणेसाठी जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य व रोख मदत करण्यात आली. सदरची मदत खोरोची गावातील भाजपाचे पदाधिकारी अजिनाथ कदम पाटील, राहुल कांबळे, राम कदम, राजीव भाळे, मोहन पाटील, राहुल कांबळे, उत्तम जाधव, विनोद सावंत, वैभव पाटील, सचिन फडतरे आदींनी नगरे कुटुंबीयांकडे सुपूर्द केली.

संबंधित लेख

Back to top button