Kagal

राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन मार्फत २५ बेडचे अद्यावत कोविड सेंटर सुरू- अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची माहिती

राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन मार्फत २५ बेडचे अद्यावत कोविड सेंटर सुरू- अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची माहिती

तुकाराम पाटील कागल

कागल : कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रभाव पाहता राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन मार्फत पंचवीस बेडचे अद्यावत कोविड सेंटर आज कार्यस्थळावर सुरू केले. स्वतंत्ररित्या उभारलेले जिल्ह्यातील हे पहिले केंद्र आहे.या सेंटरचे उद्घाटन फाउंडेशनचे या ग्रुपचे अध्यक्ष भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या केंद्रावर सहा ऑक्सिजन बेड व १९ जनरल बेडसह एकुण पंचवीस बेडची सुविधा उपल्बध आहे.आवश्यकता भासल्यास ती पन्नास बेड पर्यंत वाढविण्यात येणार आहे असेही यावेळी श्री घाटगे म्हणाले.या ठिकाणी अद्यावत रुग्णवाहिका व अग्निशामन सेवाही उपल्बध केल्याआहेत.

यावेळी व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे,कर्नाटक राज्याचे माजी उर्जा राज्यमंत्री व ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील ,वैद्यकीय अधिकारी महेंद्र पाटील ,तुषार भोसले यांच्यासह शाहू ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ते म्हणाले, मागील आठवड्यात मी सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर, ग्रामीण रुग्णालय व गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात भेट देऊन वैद्यकीय अधिकार्‍यांशी आरोग्य सुविधा व लस्सीकरण याबाबत चर्चा केली होती. याचवेळी एक सामाजिक बांधिलकी म्हणून म्हणून राजे फाउंडेशनमार्फत कोविड केअर सेंटर सुरू करणे बाबतही चर्चा केली होती.कोरोनाचा वाढता प्रभाव,व बेडची कमतरता पाहून तातडीने याबाबत निर्णय घेतला. आजपासून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
कारखाना कार्यक्षेत्रासह ,भागातील नागरिकांची सोय या ठिकाणी होणार आहे.या ठिकाणी तज्ञ डॉक्टर्ससह सर्व वैद्यकीय सुविधा उपल्बध केल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना निश्चित दिलासा मिळेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button