Amalner

पाऊस,साचलेले डबके आणि डेंग्यू चे मच्छर..!पहा जळगावात इतके तर अमळनेरात इतके डेंग्यू सदृश्य रुग्ण..!कशी घ्याल काळजी..!

पाऊस,साचलेले डबके आणि डेंग्यू चे मच्छर..!पहा जळगावात इतके तर अमळनेरात इतके डेंग्यू सदृश्य रुग्ण..!

जळगाव जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दिवसाला सरासरी ५०० हून अधिक रुग्ण डेंग्यू बाधित आहेत. डेंग्यू झाला तर तो योग्य वेळी तपासला गेला नाही तर जिव ही जाऊ शकतो.

अमळनेर शहरात सध्या 7 डेंग्यू सदृश्य रुग्ण असून डॉ गोसावी यांनी त्या त्या परिसरात फवारणी झाली आहे असे सांगितले आहे. साचलेले पाणी आणि डेंग्यू चे डास यांचे अगदी जवळचे नाते आहे.मात्र डेंग्यू होऊ नये यासाठी आपण काही गोष्टी काळजीपूर्वक टाळू शकतो.

१) डेंगूचा मच्छर हा पावसात निर्माण होतो. डेंगूचा मच्छर हा पावसाळ्यात आपली अंडी देतो. पावसामुळे शहरात विविध ठिकाणी डबके साचतात. या साचलेल्या डबक्यात डेंग्यूचे मच्छर अंडी देतात.त्यामुळे पाणी साचू नये यासाठी प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे.

२) डेंग्यूच्या डासांना पासून स्वतःचे रक्षण करण्याचे असेल तर नागरिकांनी वापर करणे गरजेचे आहे याच बरोबर झोपताना मच्छरदानी वापरावी.

३) डेंग्यू हा कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना लवकर होतो.त्यामुळे योग्य आहार,स्वच्छता, परिसर साफ सफाई,व्यायाम इ कडे लक्ष देणे आवश्यक आहे.

४)पावसाळ्यात शक्यतोवर बाहेरचे खाणे टाळावे. उघड्यावर असलेले खाद्य पदार्थ याबाबतीत धोकेदायक ठरू शकतात.

५)घरात कुठे ही पाणी साचलेले राहणार नाही याची काळजी घ्यावी.

६)न प प्रशासनाने वेळोवेळी कीटक नाशक औषध फवारण्या करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

७)तुंबलेल्या गटारी दोन्ही बाजुंनी पाणी न वाहणाऱ्या गटारी या बाबतीत अत्यन्त धोकेदायक आहेत.या संदर्भात न प प्रशासनाने उचित पाऊले उचलणे आवश्यक आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button