Amalner

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त प्रश्नमंजुषा

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त प्रश्नमंजुषा

अमळनेर : देवगांव देवळी येथील महात्मा फुले हायस्कुलमध्ये 28 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवसा निमित्ताने प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. शाळेचे
सांस्कृतीक प्रतिनिधी ईश्वर महाजन यांनी माहितीचा अधिकार याबाबत जनजागृती करीत असत इयत्ता नववीच्या वर्गात प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली. व दहावीचा विद्यार्थ्यांना माहितीच्या अधिकार बाबत शासनाच्या आदेशानुसार जनजागृती करण्यात आली. इयत्ता नववीतील स्नेहल पाटील, राजश्री पाटील, प्रणाली पाटील, हर्षला पाटील, संजना माळी,भाग्यश्री पाटील, पुजा माळी,तेजस पाटील, धुर्व पाटील यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक यांनी प्रयत्न केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button