Amalner

अमळनेर :भांडण दोन वर्षांपूर्वीचे..!आता मारले लोखंडी पाईपने..!

भांडण दोन वर्षांपूर्वीचे..!आता मारले लोखंडी पाईपने..!

अमळनेर येथील धार गावात लोखंडी पाईपने मारून एकाला रक्तबंबाळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, धार येथील अनिल नामदेव पाटीलचे 2 वर्षांपूर्वी दीपक मोतीराम पाटीलशी भांडण झाले होते. तेव्हापासून दीपक हा अनिलला सोडणार नाही, अशी धमकी देत होता.दि ४ डिसेंबर रोजी अनिल दुचाकी क्रमांक एम एच १८ ,पी ८२२५ ह्या गाडीवरून गावातील भवानी मंदिराजवळ दुधाचे कॅन घेऊन जात असताना दीपक मागाहून आला आणि लोखंडी पाईपने डोक्यावर , हातावर व पायावर वार करून रक्तबंबाळ केले. तसेच मोटरसायकलचेही नुकसान केले. अनिलने दिलेल्या फिर्यादीनुसार दीपक विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास हे कॉ सुनील तेली करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button