Parola

करमाड येथे घराच्या हिस्से वाटणीवरून पुतण्याचा काकावर चाकूने हल्ला..

करमाड येथे घराच्या हिस्से वाटणीवरून पुतण्याचा काकावर चाकूने हल्ला..

प्रतिनिधी: रजनीकांत पाटील
पारोळा : तालुक्यातील करमाड येथे २४ रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान घराच्या हिस्से वाटणीवरून झालेल्या वादात सख्या पुतण्याने आपल्या काकावर चाकूने हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी पुतण्यावर कलम ४०७प्रमाणे गुन्हा दाखल झाला.

याबाबत ललिता उत्तम पाटील (रा. धुळे) यांनी पारोळा पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, त्यांचे मूळ गाव करमाड असून त्या कामानिमित्त धुळे येथे राहतात. मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्या सासूचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे पती उत्तम पाटील व त्यांच्या भावामध्ये हिस्से वाटणी झाली होती. यात घरातील गॅस सिलिंडर हे त्यांच्या पतीच्या नावे असताना त्यांचा पुतण्या सोपान तुकाराम पाटील हा ते सिलिंडर गावात पाववडा गाडीवर वापरत होता.

दरम्यान, ललिता व उत्तम पाटील हे २४ रोजी करमाड येथे रेशन घेण्यासाठी आले होते. या वेळी भाऊ रमेश पाटील यांच्या घरी ते थांबले होते. या वेळी पुतण्या सोपान याने त्यांना शिवीगाळ करुन हिस्से वाटणीवरून वाद घातला. तसेच उत्तम पाटील यांनी समजावण्याचा प्रयत्न करताच सोपानने त्याच्या खिश्यात असलेला कांदा कापण्याचा चाकू उत्तम यांच्या पोटात मारला. त्यांच्यावर धुळे येथे उपचार सुरू आहेत. या बाबत सोपान पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय रवींद्र बागुल करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button