Amalner

Amalner: गुरे चोरीतील 6 आरोपी पोलिसांच्या ताब्यात..!

Amalner: गुरे चोरीतील 6 आरोपी पोलिसांच्या ताब्यात..!

अमळनेर पोलीस स्टेशन हददीत मागील सहा महिन्यात एकूण ०५ गुरे चोरीचे गुन्हे दाखल होते. सदरचे गुन्हे अमळनेर पोलीसांनी गोपनीय माहितीच्या आधारे उघडकीस आणले आहेत. सदरचे गुन्हे धुळे येथील १) शकील शफी शेख कुरेशी, रा. अंबिकानगर, धुळे, २) रशीद शफी शेख कुरेशी, रा. धुळे, ३) अमजद खान अजीज खान, रा. मोलवी गंज, धुळे, ४) वसीम हुसैन शेख उर्फ बाटला, रा. जनता सोसायटी,
धुळे, ५) शशीकांत सदाशिव मोरे, रा. मोहाडी, ता. धुळे, ६) रोशन उर्फे आबा मधुकर सोनवणे, रा. अंबिकानगर, धुळे यांनी संगणमत करुन केले असून ०७ बैल, ०२ गायी व ०२ वासरु एकूण ११ जनावरे चोरीस गेले होते त्यापैकी १,११,०००/- रुपये किमतींचे ०३ बैल व ०१ गाय आणि ०१ वासरु गुन्हयातील आरोपीतांकडून हस्तगत केले आहेत. आता पावेतो सहा पैकी क्र. ३ व ४ यांना अमळनेर पोलीसांकडून
अटक करण्यात आली आहे. इतर चार पाहिजे आरोपींपैकी ५) शशीकांत सदाशिव मोरे, रा. मोहाडी, ता. धुळे, ६) रोशन उर्फे आबा मधुकर सोनवणे, रा. अंबिकानगर, धुळे यांना दि.१५/१२/२०२१ रोजी अटक केली आहे. क्र.०१ व ०२ हे आरोपी अद्याप फरार आहेत. वरील सहा आरोपी हे गुरे चोरी करण्यासाठी रात्री ०१:०० ते ०४:०० वाजेच्या दरम्यान जनावरांजवळ कोणी नसल्याचा फायदा घेवून पिकअप वाहनाचा वापर करुन गुरे चोरी करतात. यातील क्र. १) शकील शफी शेख कुरेशी, रा. अंबिकानगर, धुळे, याच्यावर आजादनगर धुळे गुरनं २५०/२०१४ प्रमाणे २) रशीद शफी शेख कुरेशी, रा. धुळे, (१) चाळीसगांव पो.स्टे. गुरनं २०३/२००७ (२) आजादनगर पो.स्टे. गुरनं २५०/२०१४ क्र. ३) अमजद खान अजीज खान, रा. मोलवी गंज, धुळे, याच्यावर (१) चाळीसगांव रोड पो.स्टे. गुरनं ३२/२०१८ । गुरनं ८९/२०२० प्रमाणे ४) वसीम हुसैन शेख उर्फ बाटला, रा. जनता सोसायटी, धुळे, याच्यावर गुजरात राज्यातील (१) निजार पो.स्टे. गुरनं ४४/२०१४ (२) अंकलेश्वर पो.स्टे. गुरनं २२१/२०१४, (३) निजामपुर धुळे गुरनं ३९/२००७ (४) गुरनं १३८/२०१० प्रमाणे ५) शशीकांत सदाशिव मोरे, रा. मोहाडी, ता. धुळे, आजादनगर पो.स्टे गुरनं ०४/२००४
प्रमाणे ६) रोशन उर्फे आबा मधुकर सोनवणे, रा. अंबिकानगर, (१) धुळे तालुका पो.स्टे. गुरनं १३३/२०१३, (२) धुळे शहर पो.स्टे. गुरनं ७९/२०१२, (३) आजादनगर पो.स्टे. गुरनं १०५/२०११, (४) गुरनं १५६/२०१४ (५) गुरनं २५०/२०१४, (६) चाळीसगांव रोड पो.स्टे. गुरनं १९०/२०१४, (७) गुरनं ३२/२०१९ (८) पिसोर
कन्नड औरंगाबाद पो.स्टे. गुरनं ६१/२००९, (९) अमळनेर पो.स्टे. गुरनं १४८/२००९, (१०) नाशिक जैयखेडा पो.स्टे. गुरनं १०४/२००९, (११) चाळीसगांव पो.स्टे. ६०/२०१६ (१२) वरणगांव पो.स्टे. गुरनं ३७/२०१७ प्रमाणे असे सर्व गुरे व इतर विविध अपराधाचे गुन्हे दाखल आहेत. या व्यतिरिक्त वरील सहांवर अमळनेर
पो.स्टे. गुरनं १) ४३६/२०२१, २) ४५८/२०२१, ३) ४९५/२०२१, ४) ५०२/२०२१ व ५) ५२९/२०२१ असे केल्याचे निष्पन्न करण्यात आले आहे.
सदरची टोळी उघडकीस आणण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगांव श्री. रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि जयपाल हिरे यांच्यासह सफौ/ विलास पाटील, पुरुषोत्तम पाटील, पोह/ जनार्दन पाटील, किशोर पाटील, पोना/ शरद पाटील, दिपक माळी, मिलींद भामरे, कैलास शिंदे व पोशि/ रविंद्र पाटील, भुषण पाटील अशा टीमने काम केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button