Yawal

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याऱ्या नराधमाला कठोर शिक्षा करा… भिम आर्मीची मागणी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याऱ्या नराधमाला कठोर शिक्षा करा… भिम आर्मीची मागणी

यावल प्रतिनिधी अमित एस तडवी

भुसावळ तालुक्यातील १५वर्षिय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचि निघृण हत्या करण्यात आली या प्रकरणातील नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करून पिडित कुटुंबाला न्या मिळावा अशा मागणीचे निवेदन यावल तालुक भीम आर्मी च्या वतीने निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की भुसावळ तालुक्यातील एक गावात राहणाऱ्या एक १५ वर्षी अल्पवयीन मुलीवर दि.२फेब्रुवारी २२ रोजी पाशवी बलात्कार करून तिचा निर्दयपणे खून करण्यात आला पोलिस घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करीत जाब जवाबाच्या आधारे गावातील संशयित आरोपीस अटक केली आहे सदर या अल्पवयीन मुलीची हत्या नसून आत्महत्या केल्याचे पोलिस गुन्हात नमूद करण्यात आल्याचे आरोप पिडित मुलीच्या कुटूंबाने केला आहे ही हत्या नसल्याचा बनाव करीत या गुन्हा तील दोन संशयित आरोपीवर अधाप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नसल्याचा आरोप पिडित कुटुंबानी केला आहे.

अत्यंत निंदनीय अशा घटनेतील पोलिस प्रशासनाच्या वतीने दबाब तंत्रचा वापर करून घटना दाबण्याचा प्रकार होत असून पोलिसांनी तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल करून त्या दोन संशयित आरोपींना अटक करावी आणि कठोर शिक्षा करावी तसेच पिडित अल्पवयीन मुलीच्या कुटूंबास न्याय मिळवून घ्या अशी मागणी केली या मागणी चे भिम आर्मी चे तालुक अध्यक्ष प्रविण डांबरे तालुक उपाध्यक्ष सचिन पारधे यावल शहराध्यक्ष बबलु गजरे जिल्हा संघटक हेमराज तायडे राहूल जयकर आणि जितेंद्र गायकवाड यानी निवेदन दिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button