शहापूर

देवभाऊ उबाळे यांच्या ”जळजळीत वास्तव” काव्यसंग्रहाचे प्रकाशन

देवभाऊ उबाळे यांच्या ”जळजळीत वास्तव”
काव्यसंग्रहाचे प्रकाशन

शहापूर प्रतिनिधी मिलिंद जाधव

शहापूर तालुक्यातील कसारा येथे राहणारे कवी, लेखक देवभाऊ उबाळे यांच्या ”जळजळीत वास्तव” काव्यसंग्रहाचे प्रकाशन दिनांक ८ नोव्हेंबर २०१९ रोजी कसारा विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृहात माजी आमदार पांडुरंग बरोरा, प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे, गजलकार प्रकाश गांगुर्डे, कसारा विभाग एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष रविंद्र शेजवळ, दिलीप कांबळे, गजलकार , गजानन तुपे, कसारा रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव, अविनाश थोरात, सरपंच प्रकाश साबळे, शशीभाई उबाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

कवी सहजपणे चंद्रावर पोहचू शकतो एवढ सामर्थ्य कवी मंध्ये असत असे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी बोलतांना सांगितले.

कवितेमधील एकजरी शब्द इकडचा तिकडे झाला तरी कविता विकृती निर्माण करू शकते. म्हणून प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. कविता लिहतांना तुमच्यावर वामनदादा कर्डक, अण्णाभाऊ साठ्ये, यांचा प्रभाव असला पाहिजे. देवभाऊ उबाळे यांनी लिहलेल्या ”जळजळीत वास्तव” काव्यसंग्रहातून कवी सरकारकडे मागणी करीत आहे असे दिसते. कवीने वास्तव लिहले पाहिजे. कवी जन्माला येत नसतो तर तो आपल्या परिस्थितीतुन निर्माण होतो. देवभाऊ उबाळे हे विज्ञाननिष्ठ कवी आहेत. कवीची निरीक्षणशक्ती दांडगी असून अनेक ठिकाणी त्यांनी अनुभव कथन केले आहे. आपल्या भोवतालच्या पर्यावरणातील अनेक समस्या वर कवीने प्रकाशझोत टाकला आहे. चळवळ नात्यातले संबंध मासिक पाळी सारख्या समस्या बाबतीत वैज्ञानिक आधार लेखक देवभाऊ उबाळे यांनी शोधले आहेत.असे डॉ. विठ्ठल शिंदे यांनी बोलतांना सांगितले.

महामानवांनी केलेले कार्य, त्यांचे विचार व जेष्ठ मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली मी ”जळजळीत वास्तव” काव्यसंग्रह लिहू शकलो. विविध विषयांवर ६३ कवितांचा समावेश असून समाज प्रबोधन व परिवर्तनाच्या कविता माझ्या लेखणीतून निर्माण झाल्या आहेत, माझ्या आवडीनुसार पुस्तके वाचत गेलो. आणि त्यामधून मला लिहिण्याची प्रेरणा मला मिळाली. वास्तवादी जीवनातील प्रसंग रेखाटण्याचे काम ”जळजळीत वास्तव” काव्यसंग्रहातून मी केले आहे. असे कवी,लेखक देवभाऊ उबाळे यांनी बोलतांना सांगितले.

यावेळी मनिषा मेश्राम,संघरत्न घनघाव, अण्णा पवार, लक्ष्मण बल्लाळ, मिलिंद जाधव ,आनंद वाघचौरे, शिवाजी पगारे,कविता बिरारी, मिलिंद घायवट,मदन गवळे, काळू पंडित, अविनाश कासार यांनी विविध विषयांवर स्वरचित कविता यावेळी सादर केल्या.कार्यक्रमाचे प्रस्तावित कवी मिलिंद घायवट यांनी तर सूत्रसंचालन युवा कवी मिलिंद जाधव यांनी केले.

Leave a Reply

Back to top button