Maharashtra

११ऑक्टोंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र बंदला लोकराज्य जनता पार्टीचा जाहीर पाठिंबा. उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खिरी येथील शेतकरी हत्येचा जाहीर निषेध.

११ऑक्टोंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र बंदला लोकराज्य जनता पार्टीचा जाहीर पाठिंबा. उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खिरी येथील शेतकरी हत्येचा जाहीर निषेध.

सुभाष भोसले

उत्तरप्रदेश मधील लखीमपुर खिरी येथे शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये गाडी घालून अनेक शेतकऱ्यांची हत्या भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने केली आहे. जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या हत्येचा जाहीर निषेध लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला. सदरची घटना अत्यंत दुःखदायक व संतापजनक असून या घटनेच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबर 2021 रोजी महाविकासआघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला लोकराज्य जनता पार्टीने जाहीर पाठिंबा दिला. शिवाजी चौक येथे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या बंद मोर्चा मध्ये लोकराज्य जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांना पाठिंब्याचे पत्र दिले. याप्रसंगी लोकराज्य जनता पार्टीचे पदाधिकारी कोल्हापूर शहर सरचिटणीस श्री. अशोक तोरसे, जिल्हा संघटक अमोल कांबळे,शहर संघटक संतोष बिसुरे, हिंदुराव पोवार, सर्जेराव भोसले,बाळकृष्ण गवळी ,शशिकांत जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बंद निमित्त शिवाजी पुतळा, लक्ष्मीपुरी,शाहूपुरी,राजारामपुरी, एस टी.स्टँड,दसरा चौक,बिंदू चौक,गंगावेश, रंकाळा स्टँड , महानगरपालिका या मार्गावरून निघालेल्या मोटर सायकल रॅलीत लोकराज्य जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button