Pandharpur

अमरावती महानगरपालिका आयुक्त (मुख्याधिकारी संवर्ग) डॉ. प्रविण आष्टीकर यांचे वर शाई फेकणारे यांचा पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना (इंटक) च्या वतीने जाहीर निषेध

अमरावती महानगरपालिका आयुक्त (मुख्याधिकारी संवर्ग) डॉ. प्रविण आष्टीकर यांचे वर शाई फेकणारे यांचा पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना (इंटक) च्या वतीने जाहीर निषेध

प्रतिनिधी
रफिक अत्तार

अमरावती येथील महानगरपालिका आयुक्त (मुख्याधिकारी संवर्ग) डॉ. प्रविण आष्टीकर कार्यालयीन कामकाज निमित्त राजापेठ रेल्वे अंडरपास या ठिकाणी स्थळ निरिक्षणा करिता गेले असता काही महिलांनी अंगावर व चेहऱ्यावर शाई फेकली या घटनेचा निषेध महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीचे राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळूजकर व मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर नगर परिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे सह कार्याध्यक्ष शरद वाघमारे,नागनाथ तोडकर यांच्या नेतृत्वाखाली लेखणी बंद आंदोलन करून झालेल्या घटनेचा निषेध करून निदर्शने करण्यात आले यावेळी कामगार संघटना चे पदाधिकारी जयंत पवार,अनिल अभंगराव,संजय माने,नेताजी पवार, दत्तात्रय चंदनशिवे बाळू कांबळे,पराग डोंगरे,स्वप्नील डोके,अतुल केंद्रे, धनाजी साळुंखे,सुनील सोनार व सर्व कर्मचारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button