sawada

पत्रकार दिनानिमित्त सावदा येथे सुप्रसिद्ध कवयित्री व ज्येष्ठ पत्रकार शांताताई शेळके यांचे जीवनावर जाहीर व्याख्यान

पत्रकार दिनानिमित्त सावदा येथे सुप्रसिद्ध कवयित्री व ज्येष्ठ पत्रकार शांताताई शेळके यांचे जीवनावर जाहीर व्याख्यान

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे दि.६ जानेवारी २०२२ रोऊ पत्रकार दिनानिमित्त ओरिजनल पत्रकार संघ सावदा यांचे तर्फे एक प्रतिभासंपन्न विविध पुरस्काराने सन्मानित मराठी कवियत्री तथा जेष्ठ पत्रकार शांताताई शेळके यांचे जीवनावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून याकार्यक्रमाचे वाख्याते नितीनजी मटकरी प्राध्यापक के.सी.ई. सोसायटी जळगांव हे असून सदर कार्यक्रम सावदा येथील विश्रामगृहा समोरील प्रजापिता ब्रम्हकुमारी विद्यालय येथे सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे.

याप्रसंगी कोरोना काळात मयतांवर अंत्यसंस्कार करणारे कोरोना योद्धे सह जेष्ठपत्रकार समाजसेवी व्यक्ती यांचा देखील सत्कार करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्ताईनगर मतदार संघाचे झुंजार आ.चंद्रकांत पाटील तर उद्दघाटक म्हणून रावेर यावल भागाचे उपविभागीय अधिकारी भाग फैजपूर कैलास कडलग हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सावदा पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सावदा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष एपीआय देविदास इंगोले, कु.वैशाली दीदी प्रजापिता ब्रम्हकुमारी विद्यालय सावदा आदी मान्यवर उपस्थित राहणार असून कोरोना नियम पाळून हा कार्यक्रम संपन्न होणार असून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ओरिजनल पत्रकार संघ सावदा तर्फे करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button