Pandharpur

कोर्टी ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार अमोल गुरव यांच्या सहकार्याने पत्रकारांचा जाहीर सत्कार.

कोर्टी ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार अमोल गुरव यांच्या सहकार्याने पत्रकारांचा जाहीर सत्कार.

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे कोर्टी ग्रामस्थ आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पंढरपूर शहर व तालुक्यातील सुरक्षा समितीचे पत्रकार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष कोळी, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, गट विकास अधिकारी प्रशांत काळे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव,श्री विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक द्रोणाचार्य हाके पांडुरंग सह साखर कारखान्याचे,बहिरू माळी, रघुनाथ माळी, उपसभापती अरुण घोलप,माजी सरपंच जब्बार शेख,रघुनाथ पवार,एस एन इंगोले, भारत पवार, सहायक गट विकास अधिकारी, पिसे, पठाण,महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे, शहराध्यक्ष दत्ताजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते, या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार अमोल गुरव यांनी केले होते.या कार्यक्रमात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे, शहराध्यक्ष दत्ताजी पाटील,तालुका उपाध्यक्ष विठ्ठल जाधव,विकास सरवळे, सचिन कुलकर्णी, अजित देशपांडे, खानसाब मुलाणी,प्रकाश इंगोले,प्रकाश सरताळे, रवींद्र शेवडे(जिल्हा कार्याध्यक्ष)हुसेन मुलाणी, विश्वास पाटील,सौ सुरेखा भालेराव,(नागटिळक)राजेंद्र नागटिळक, चैतन्य उत्पात,कबीर देवकुळे, रफिक आतार, विनोद पोतदार,रामकृष्ण बिडकर,बाहुबली जैन,कोर्टी ग्रामस्थ जमीर शेख,सुखदेव मिसाळ, धनाजी अनुसे,कार्यक्रमाचे आयोजक अमोल गुरव यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी महेश येडगे ,सहायक गट विकास अधिकारी पिसे म्हणाले,अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार करीत असतात,त्यांनी असेच कार्य सुरू ठेवावे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद सरवदे म्हणाले, अमोल गुरव यांनी आम्हा पत्रकारांचा मोठा सन्मान केला आहे, याबद्दल मी ऋणी आहे, पत्रकारिता करणे सोपे राहिले नाही, एखादा चुकत असेल तर सांगणे आमचे काम आहे,पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी सुरक्षा समितीची स्थापना केली आहे. पत्रकारांनी शहानिशा करून बातमी द्यावी असे महसूल नायब तहसीलदार पंडित कोळी म्हणाले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र शेवडे यांनी केले.रामकृष्ण बिडकर यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button