World

अभिमानास्पद..टोकियो Olympic.. पी व्ही सिंधुची उत्कृष्ट कामगिरी..!पटकावले कांस्य पदक

अभिमानास्पद..टोकियो Olympic.. पी व्ही सिंधुची उत्कृष्ट कामगिरी..!पटकावले कांस्य पदक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या पी. व्ही. सिंधू हीचं सर्वत्र कौतुक होत आहे. तिचे राष्ट्रीय कोच पी. गोपिनाथ यांनी “awesome” अशा एका शब्दांतच सिंधूचं कौतुक केलं आहे.

स्पर्धेत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने कांस्यपदकाची कमाई केली आहे. तिने चीनच्या हे बिंगजिओ हिला २१-१३, २१-१५ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. सिंधूच्या या विजयामुळे भारताने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये दुसरं पदक मिळवलं. याआधी वेटलिफ्टर मिराबाई चानूने रौप्यपदकाची कमाई केली होती.

काल याच स्पर्धेत सिंधूला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. वर्ल्ड नंबर वन ताइ त्झू यिंगने 21-18, 21-12 असे सरळ सेटमध्ये पराभूत करत फायनल गाठली होती. या पराभवामुळे सिंधूचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले. तरीही तिच्याकडून पदकाची आस कायम होती कारण तिची लढत आज चीनच्या हे बिंगजिओ हीच्यासोबत होती. हा सामना जिंकत तिनं आपलं कांस्य पदक निश्चित केलं.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button