Amalner

अभिमानास्पद…स्पृहा हाॕस्पीटल येथे तब्बल १.७५ किलोचा गोळा काढण्यात डॉ ना यश..

अभिमानास्पद…स्पृहा हाॕस्पीटल येथे तब्बल १.७५ किलोचा गोळा काढण्यात डॉ ना यश..

अमळनेर खान्देशातील सुप्रसिद्ध सर्जन डॉ.अनिल शिंदे यांच्या नर्मदा फाउंडेशन येथे तब्बल १.७५ किलोचा वजनाचा गोळा शस्त्रक्रिया करुन यशस्वीपणे काढण्यात आला आहे. अश्या अवघड शस्त्रक्रियांच्यावेळी आलेल्या यशानंतर डाॕ देवदूत ठरतात.
अत्यंत कठीण व किचकट अशी शस्त्रक्रियेत अमळनेर चे सुप्रसिद्ध असे डाॕ. अनिल शिंदे , डाॕ. मयुरी शिंदे-जोशी (MS general surgeon DNB gynec at spruha hospital) यांचे विशेष योगदान आहे तर डाॕ. प्रांजल पाटील, अलिम शेख(ओ टी असिस्टंट) साराह परिचारीका आणि स्पृहा हाॕस्पीटलच्या सगळ्या टीमचे अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल हार्दीक हार्दीक आभिनंदन!

अमळनेर तालुक्यातील सारबेटे येथील 75 वर्षीय महिलेच्या पोटात गोळा वाढत होता.त्यामुळे त्या महिलेला अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.स्पृहा हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉ अनिल शिंदे आणि डॉ मयुरी जोशी यांनी निदान केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. पण महिलेचे वय खूप असल्याने ही एक मोठी जोखीम होती तरी ही आत्मविश्वासाने ह्या टीम ने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली असून डॉ अनिल शिंदे हे नेहमीच रिस्क घेत रुग्णाला ठणठणीत बरे करतात.त्यांचा खूप वर्षाचा अनुभव आणि सराव यामुळे अनेक मोठं मोठ्या शस्त्रक्रिया आणि अगदी रिस्की रुग्ण देखील ह्या दवाखान्यातून चांगले होऊन सुखरूप घरी परतले आहेत.डॉ संदीप जोशी यांची जोड मिळाल्यानंतर अधिकच उत्कृष्ट कामगिरी आणि औषध उपचार नर्मदा फाउंडेशन आणि स्पृहा हॉस्पिटल च्या माध्यमातून होत आहेत.नुकतेच डॉ सुनील शिंगाणे या अत्यन्त होतकरू डॉ ना फिनिक्स हॉस्पिटल च्या माध्यमातून सहकार्य करत साधारण गरीब जनतेसाठी एक महत्वाचे पाऊल डॉ अनिल शिंदे,डॉ संदीप जोशी आणि डॉ मयुरी जोशी यांनी उचलले आहे.डॉ सुनील शिंगाणे हे रक्तदूत मनोज शिंगाणे यांचे बंधू असून मनोज शिंगाणे यांची रक्तदान चळवळ आणि प्लासमा चळवळ कोरोना काळात सर्वांनाच उपयुक्त ठरली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button