Chandwad

ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा चांदवड नगरपरिषद वतीने निषेध व निवेदन

ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा चांदवड नगरपरिषद वतीने निषेध व निवेदन

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : दिनांक ३० ऑगस्ट २०२१ रोजी ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिपळे, माजिवाडा प्रभाग या अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनाधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असतांना तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचे हातगाडी फेरीवाले व अमरजित यादव यांनी त्यांच्यावर व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर तीक्ष्ण हात्याराने जीवघेणा हल्ला करून या दोघांनाही गंभीर दुखापत केली आहे याचा चांदवड नगरपरिषदेच्या वतीने निषेध करण्यात आला व प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलिस निरीक्षक चांदवड येथे निवेदन देण्यात आले
सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंगळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे पूर्णपने तुटून रस्त्या उजव्या हाताला यह गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या डोक्या खोल मार लागला आहे. अंगरक्षक. सोमनाथ पालवे यांच्या डाव्या हाताचे एकबोट पूर्णपणे तुटून पडले झालेला प्रकार आतिशय गंभीर असून
एका महिला अधिकार्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे हे नक्कीच अत्यंत चिंताजनक बाब असून या बाबीचे सर्व स्तरावरून निषेध होणे आवश्यक आहे.असेही निवेदनात नमूद केले आहे
त्यामुळे चांदवड नगरपरिषदेच्या वतीने गुन्हेगारी कृत्याचा जाहीर निषेध करत हल्लेखोरांवर कठोर कारवाई अटक केलेल्या गुन्हेगारांवर शीघ्र गतीने खटला चालून कायद्या नुसार कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न व्हावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी चांदवड नगरपरिषदेचे स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता सत्यवान गायकवाड, बांधकाम अभियंता अनिल कुरे, कर व प्रशासकीय अधिकारी पवन कस्तुरे, संगणक अभियंता तुषार बागूल, लिपिक अमोल आहेर, महेंद्र कांदळकर, कैलास गांगुर्डे, मूफिज शेख, शैलेश पवार, राजू बेलदार आदी कर्मचारी उपस्तीत होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button