sawada

मानव निर्मित संकटापासून संरक्षण द्या:अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी!

मानव निर्मित संकटापासून संरक्षण द्या:अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी..शेतकऱ्यांची मागणी

फैजपूर प्रांत अधिकाऱ्यांकडे खिरोदा मंडळातील त्रस्त शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली एकमुखी मागणी.

—————————————-
“यावेळी परिस्थितीची प्रणीती बिघडू नये त्या आधीच सावदा व निभोंरा पोलीस स्टेशन यांना कारवाई करणे बाबतच पत्र देवून जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रशासन यांच्याकडे तसा अहवाल पाठवून अवगत करण्यात येईल.असे प्रांत अधिकारी कैलास कडलक यांनी सांगितले.”
—————————————-

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या व सावदा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चिनावल येथे ५ दिवसांपूर्वी एका शेतकरी व काही पिक चोरट्यां मध्ये मोठा वाद झाल्यापासून शेतकऱ्यांचे केळीचे झाडे कापून फेकून देण्याचा प्रकार थांबला नसून भयभीत झालेल्या शेतकरी वर्गाकडून दि.२१ फेब्रुवारी २०२२ रोजी रोझोदा येथे मंदिर परिसरात चर्चासत्राच्या माध्यमातून एकवटले व याप्रसंगी शेती पिकांसह शेती उपयोगी इतर महागडी सामुग्री चोरीचे प्रकार सतत घडत असताना आधीच आसमानी व सुलतानी संकटाने ग्रस्त शेतकरी वर्ग चोरट्यांमुळे अधीक हतबल दिसून येतो. ह्या गोष्टींकडे संबंधित पोलिस प्रशासन देखील सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत असतात.म्हणून कायद्याला न जुमानता शेतमालाची चोरी व उभ्या पिकांची नासधूस करून शेतकरी वर्गात थेट दहशत माजवणारे चोरटे वरचढ ठरत आहे.(“चाकी चाकी सब कहे किली कहे ना कोई -दो पाठण के बीच कबीरा साबूत बचाना कोई”)असे सुप्रसिद्ध संत कबीरदास यांनी म्हटलेल्या दोहे प्रमाणे शेतकऱ्यांची दुरावस्था झालेली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,दि.१९ फेब्रुवारी रोजी पासून ते आज दि.२३ फेब्रुवारी २०२२ दरम्यान शेतकऱ्यांच्या शेतातून पिकांची चोरी व उभे पीक कापून फेकून देण्याचे प्रकार थांबलेले नाही.आज पुन्हा चिनावल येथील शेतकरी कमलाकर नारायण भारंबे व निखिल पितांबर भारंबे यांच्या शेतातून चार लाखांपेक्षा जास्त किंमतीचे खोळा सकट १२०० केळीचे घड कापून फेकून दिल्याची फिर्याद सावदा पोलिसात दिल्याने २ अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा नोंद झाला. यानंतर”शेत पिकांची व यंत्र सामुग्रीची सतत होणारी चोरी व नुकसान करणाऱ्यावर ठोस कार्रवाई बाबत तसेच शासनाचा कोणताही कर न भरणे बाबत.”या विषया खाली शेतकऱ्यांनी सविस्तर पणे सदरील समस्या व होणाऱ्या त्रास कायमस्वरूपी थांबावा.अन्यथा शेतकऱ्यांचा संयम सुटल्यास गाव व शेती शिवारात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.चोरटे अश्या वेळी महिलांना पुढे करून विनयभंग ॲट्रॉसिटी कायद्याची धमकी देतात.यामुळे शेतकरी हतबल व त्रस्त झालेला आहे.सबब प्रशासनाने याची त्वरीत दखल घेऊन नियोजनपूर्वक शेतकऱ्यांना संरक्षण देण्याबाबत ठोस उपाय योजना कराव्या.नाही तर सदरील मानव निर्मित संकटामुळे शेतकऱ्यास आपण आत्महत्याची परवानगी द्यावी.असे सरासरी ३०० शेतकऱ्यांनी आज २३ फेब्रुवारी रोजी ४ वाजता सामूहिकरित्या उपविभागीय अधिकारी कैलास कडलक फैजपूर यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.यावेळी श्रीकांत सरोदे व त्रस्त शेतकऱ्यांनी व्यथा मांडताना सावदा व निभोंरा पोलीस स्टेशन येथे शेतकऱ्यांकडून सरासरी ३०० तक्रारी दाखल आहे.मात्र कारवाई शुन्य असल्यामुळे चोरटे शेतीमाल चोरून थेट मुंबई येथे रेल्वेद्वारे विक्रीस नेतात.असा एकंदरीत पाढा येथे वाचण्यात आला.
निवेदनावर खिरोदा मंडळातील चिनावल,रोझोदा, खिरोदा,कुंभारखेडा,सावखेडा, कोचुर,लोहारा,निंभोरा,सावदा येथील ६०० शेतकऱ्यांच्या सह्या आहे.याप्रसंगी श्रीकांत सरोदे, उसरपंच परेश महाजन,पोलीस
पाटील निलेश नेमाडे तंटामुक्ती अध्यक्ष योगेश बोरोले,चंद्रकांत भंगाळे,दिगंबर चौधरी, सोनाजी नेमाडे,कमलाकर भारंबे,चिनावल व हर्षल बोरोले खिरोदा,मिलिंद वाघुळदे फैजपूर,बापू भारंबे सावदा,आर.के.चौधरी,चिमण भाऊ धांडे,उपसरपंच दीपक धांडे रोझोदा सह इत्यादी गावातील पोलीस पाटील सरपंच उपसरपंच व शेतकरी संख्येने उपस्थित होते.

(“शेतमाल व सुरक्षेसंदर्भात परिसरातील सरपंच उपसरपंचौ पोलीस पाटील व त्रस्त शेतकऱ्यांची बैठक घेतली आहे. ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करून शेतकऱ्यांचा शेतमालाला कृषि सामग्रीला संरक्षण दिले जाईल.” अशी प्रतिक्रिया २३ फेब्रुवारी २०२२ रोजी एका वृत्तपत्रात आल्यानंतर सदरील बैठक संदर्भात प्रांत अधिकारी समक्ष सदरील पदाधिकारी व त्रस्त शेतकर्‍यांकडे चौकशी केली असता त्यांनी अशी कोणतीच बैठक सावदा पोलीस अधिकारी सोबत झाली नसल्याचे सांगितले.मात्र आज पुन्हा १२०० केळीचे घड कापून फेकून दिल्याचा प्रकार घडल्यामुळे मुक्ताईनगर चे पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक लावंड व एपीआय इंगोले हे चिनावल गावात आले असता सदर प्रसंगी या घटना कसे थांबविता येईल यावर दोघांनी मार्गदर्शन केले.व हीच प्रथम बैठक त्यांच्या सोबत झाल्याची कबुली त्यांनी दिली.)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button