Rawer

रावेर गट शिक्षणाधिकारी यांनी जि.प.मध्ये परस्पर सादर केलेला प्रस्ताव व आदर्श शिक्षक पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात

रावेर गट शिक्षणाधिकारी यांनी जि.प.मध्ये परस्पर सादर केलेला प्रस्ताव व आदर्श शिक्षक पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात

ठळक मुद्दे

सदरील प्रस्ताव रद्द होणे बाबत २५ ऑगस्ट रोजी प्रा. शिक्षणाधिकारी जळगांव कडे दाखल होती तक्रार

पं.स.रावेर मधील आढावा बैठकीत शिक्षक पुरस्कार प्रस्ताव बाबत गट शिक्षणाधिकारी यांना माफी का मागावी लागली

या प्रकरणाकडे जि.प. प्रा. शिक्षण अधिकारी यांनी लक्ष न देण्यामागचे कारण काय?

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्तीसाठी ३ आपत्य असल्याची माहिती महीला उपशिक्षक यांनी लपवली.?

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

जळगांव जिल्ह्यातील रावेर येथे जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा नं.१ मध्ये उपशिक्षक असलेली महिला यांनी स्वतः ला ३ आपत्य असूनही जाणीवपूर्वक रित्या ही माहिती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त करण्यासाठी लपवण्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.

तसेच या महिला उपशिक्षकचा नाव आदर्श शिक्षक पुरस्कार प्रस्तावातून वगळण्यात यावे याबाबत दि.२५ ऑगस्ट २०२१ रोजी प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद जळगांव सह इतर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केलेली तक्रार कडे थेट दुर्लक्ष करून पुढील कार्यवाही केली असून विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून प्रसिद्ध यादीत सदरील महिला उपशिक्षक यांचे नाव समाविष्ट असल्याचे समोर आलेले आहे.

सदरचा प्रस्ताव पंचायत समिती रावेर सभागृहाला अंधारात ठेवून परस्पर जि.प.जळगांव येथे का पाठवण्यात आला या कारणाखाली दि.९ सप्टेंबर २०२१ गुरुवार रोजी रावेर पंचायत समिती सभागृहात घेण्यात आलेली आढावा बैठकीत जागृत सदस्यांनी प्रश्न उपस्थित करताच थेट गट शिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांनी सभागृहात चक्क माफी मागितल्याची घटनासुद्धा घडलेली असून याप्रकरणी सभापती यांनासुद्धा गटशिक्षणाधिकारी यांनी अंधरात ठेवून सदरचा प्रस्ताव पाठविल्याची धक्कादायक बाब त्यावेळी समोर आलेली आहे.

सभागृहात आढावा बैठकीत सदस्यांकडून जाहीर झालेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार संबंधी आर्थिक देवाण-घेवाण, झाल्याची शक्यता सह परस्पर प्रस्ताव जि.प. मध्ये पाठवणारे कोण? तीन आपत्य असतांना पुरस्कार देता येतो का? नेमके किती प्रस्ताव आले होते? रावेरमधून कोणाचा प्रस्ताव आला नव्हता का? इतर शिक्षकांना याची माहिती कळवण्यात आली होती का? असे पुरस्काराशी निगडित विविध गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यावेळी गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी जाणीवपूर्वक रित्या सदरची गंभीर चूक करणारे गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांच्याविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे आदेश देण्या ऐवजी अशी गंभीर चूक व्हायला नको फक्त असे त्या वेळी सांगितले. सभागृहात सदस्यांनी उघडकीस आणलेला हा गंभीर प्रकरण गट विकास अधिकारी यांना गंभीर का वाटला नसावा अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

तरी सध्याचे जाहीर झालेले आदर्श शिक्षक पुरस्काराशी संबंधित प्रकरणात स्वतःला ३ आपत्य असल्याची बाब लपवून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवणारी महिला उपशिक्षक, गट शिक्षणाधिकारी शैलेश दखणे, गट विकास अधिकारी सह प्राथमिक शिक्षण अधिकारी जि.प.जळगांव यांची भूमिका व जबाबदारी अनुसार सखोल चौकशी करून त्यांच्यावर नियमानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव हे तात्काळ कारवाई करतील का? याकडे आता सर्व तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button