Kolhapur

प्रा .हिंदुराव पाटील यांचा दूधसाखर विद्यानिकेतन बिद्री येथे सत्कार संपन्न…

प्रा .हिंदुराव पाटील यांचा दूधसाखर विद्यानिकेतन बिद्री येथे सत्कार संपन्न…

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : बिद्री येथील दूधसाखर विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेजचे प्रा . हिंदुराव रामचंद्र तथा एच .आर .पाटील यांची कोल्हापूर जिल्हा राज्यशास्त्र महाविद्यालयीन परिषदेच्या कोषाध्यक्षपदी व शिक्षकभारती संघटनेच्या कागल तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य आर . व्ही . पाटील , उपप्राचार्य प्रा . एस . एस . पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्राचार्य आर .व्ही . पाटील सर म्हणाले की प्रा . एच आर . पाटील यांनी को . जि . मा . शि .च्या चेअरमन पदाच्या काळात जिल्ह्यातील जवळपास ५५० शाळांना भेटी देवून चेअरमन आपल्या शाळेत हा उपक्रम राबविला असल्यामुळे त्यांनी स्वतः ची एक चांगली ओळख करून देण्याबरोबरच दूधसाखर विद्यानिकेतन बिद्रीचे नावही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे काम केलेले आहे, प्रचंड आत्मविश्वास, जिद्द, धाडसी वृत्ती ,कामाची आवड, वेळ देण्याची क्षमता यामूळे ते शिक्षणाबरोबरच राजकिय, सामाजिक सहकारक्षेत्रात यशस्वी झालेले आहेत . त्यांच्या वाटचालीस दूधसाखर परिवाराच्या शुभेच्छा राहातील .
यावेळी प्रा . सी .व्ही . जाधव यांचेही भाषण झाले .
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा .आर . के .पाटील यांनी केले यावेळी व्होकेशनल विभागप्रमुख प्रा. एन . डी .पाटील, उपमुख्याध्यापक प्रा . एस . बी . जाधव , प्रा. ए .जी .म्हातुगडे, प्रा. ए . एल . चौगले, प्रा. पी . टी . आयरेकर,प्रा .एस . आर .पाटील, , प्रा. एच. डी .तिराळे, प्रा. एस . आर . वावरे, प्रा. व्ही . डी . शेळके, प्रा. एस .व्ही .कोरवी , प्रा. बी . एम चव्हाण ,.प्रा. एम . एल . बेलेकर , प्रा. सौ .पी . एस शिंदे,प्रा.कु .ए.ए. रानमाळे प्रा .सौ . एम .एम .पोतदार,प्रा. पी . एस . सुतार, प्रा. विजय देसाई, प्रा. डी .बी .मोरे , प्रा. यू. पी . फराकटे ,,प्रा .अजित शिर्के,
प्रा. श्रीकांत फराकटे,प्रा. सौ . एम .एम . पाटील, प्रा .सौ .आर .के .पाटील,प्रा .सौ .आर . आर . इंगळे, प्रा. सौ .एस . आर .कांबळे , प्रा. कु .डी .आर .सावंत,श्री . पी . जी . पाटील, श्री . डी जी .पाटील,श्री . सुनिल वारके ,श्री .पी .वाय. वड्ड, श्री . ए .टी . पाटील, श्री . व्ही .एम .पाटील ,श्री .बी एम . परीट,श्री .गौरव पाटील, श्री सागर सुर्यवंशी ,श्री . एम .एन . गिरी . श्री . के . जी . मोरे, श्री के . टी . लोकरे,श्री . हिंदुराव फराकटे, श्री .सुभाष कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.. सूत्रसंचलन प्रा .विनय कुलकर्णी यांनी केले. आभार प्रा . पी .एस . सुतार यांनी मानले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button