यावल

खाजगी व्यवसायीकाचे घाण पाणी बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावर

खाजगी व्यवसायीकाचे घाण पाणी बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावर

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

अक्सानगरसह यावल शहरात संतप्त भावना

प्रतिनिधी सुरेश पाटील

यावल दिनांक 4 ता.प्र. येथील बऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गावर हतनुर पाटबंधारे उपविभाग यावल यांच्या कार्यालयाजवळ एका खाजगी व्यवसायिकाचे ऑइल / तेल मिश्रित घाण पाणी गटारी अभावी महामार्गावरून वाहत असल्याने या ठिकाणी बरेच दुचाकी वाहने चालणारे घसरून जखमी होत असल्याने तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने अक्सानगरसह संपूर्ण यावल शहरात संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे.
यावल चोपडा तथा बऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गावर हतनुर वसाहतीजवळ, शरद ऑइल मिल जवळ, श्री साई गार्डन फॅमिली रेस्टॉरन्ट जवळ यावल सार्वजनिक बांधकाम विभागाची गटार माती व गाळाने पूर्ण भरली आहे या ठिकाणी जे काही खासगी उद्योग आहेत ( शरद ऑइल मिल वगळता ) त्यांच्या मशनरीचे रिपेरिंग चे घाण तेल / ऑइल मिश्रित पाणी भररस्त्यात म्हणजे महामार्गावरून सतत वाहत आहे या ठिकाणी आधीच चोपडा कडे जाणाऱ्यांसाठी चढाव व यावल कडे येणाऱ्यांसाठी उताराचा भाग असल्याने पायदळ चालणाऱ्यासह वाहनधारकांना मोठा अडथळा निर्माण होत आहे सारखे घाण पाणी वाहत असल्याने आणि अतिपावसामुळे याठिकाणी महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहे पर्यायी महामार्गावरून जाणाऱ्या व महामार्गाला लागून असलेल्या वसाहतीमधील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम यावल उपविभागाने याठिकाणी गटारीचे बांधकाम करून महामार्गावर खाजगी व्यवसायीकाचे घाण पाणी येणार नाही याबाबत तसेच येथील पडलेल्या खड्ड्यांची तात्काळ डागडुजी करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button