Amalner

धनदाई महाविद्यालयात शिक्षक दिनी उपक्रमशील शिक्षक व पत्रकारांचा गौरव

धनदाई महाविद्यालयात शिक्षक दिनी उपक्रमशील शिक्षक व पत्रकारांचा गौरव

अमळनेर प्रतिनिधी- धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयातर्फे ५ सप्टेंबर २०२१ रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून उपक्रमशील शिक्षक व पत्रकार बांधवांचा गौरव करण्यात आला.

धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयात दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. यावर्षीही कोव्हिड १९ च्या आपत्ती काळात ऑनलाईन तंत्रशिक्षण राबवून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक बांधवांचा तसेच शैक्षणिक, सामाजिक ,सांस्कृतिक क्षेत्रात कोरोना काळात जीवाची पर्वा न करता पत्रकारांनी दिलेले योगदान यांची दखल घेऊन या महाविद्यालयाने शाल, बुके व गौरव प्रमाणपत्र देऊन उपस्थित पत्रकार बांधव व भगिनींना सन्मानित केले.

यात शिरसाळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय बोरसे, सरस्वती विद्या मंदिरचे मुख्याध्यापक रणजित शिंदे, के. डी.गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंदा नेतकर, जि. प. शाळा पिंगळवाडेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे. तंत्रस्नेही शिक्षक भूषण महाले, अशोक पाटील,मनीषा पाटील, प्रेमराज पवार, जयश्री पवार, खेमचंद पाटील,अश्विनी पाटील, विजय पाटील, विलास पाटील, भैय्यासाहेब साळुंके, निरंजन पेंढारे ,अर्चना बागुल, नितीन संदानशिव या शिक्षकांचा शिक्षक गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे संपूर्ण कोरोना कालखंडात समाज जागृती व्हावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या व सामाजिक बांधिलकी जपणार्‍या पत्रकार बांधवांना पत्रकार गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये चंद्रकांत काटे (पुण्यनगरी) चंद्रकांत पाटील (दिव्य मराठी) संजय पाटील (लोकमत ) किरण पाटील, चेतन राजपूत (दैनिक वास्तवता) राजेंद्र पोतदार (देशदूत) उमेश काटे (सकाळ ) जितेंद्र ठाकूर (खबरीलाल न्यूज)महेंद्र रामोशे (अमळनेर 7 न्यूज) मिलिंद पाटील (महाराष्ट्र टाईम्स) मुन्ना शेख (दै.भास्कर ) गौतम बिऱ्हाडे ( दै.अमळनेर आजलग )जयेश कुमार काटे (प्रजाराज्य न्यूज,) प्रा.विजय गाढे (देशोन्नती) ईश्वर महाजन (मराठी लाईव्ह न्यूज) प्रा. जयश्री साळुंखे (ठोस प्रहार) उमेश धनराळे (सहारा समय) जयवंत वानखेडे ( देशोन्नती) समाधान मैराळे (दिव्य लोकतंत्र) कुंदन खैरनार ( एम एन न्यूज) आर. जे.पाटील (सकाळ) संभाजी देवरे( लोक न्यूज) अजय भामरे (लेखन मंच) सुरेश कांबळे (दिव्य खान्देश) राहुल बहिरम (लोकशाही)हितेंद्र बडगुजर (अटकाव) डॉ.युवराज पाटील (मार्मिक समाचार) सत्तार खान (प्रजा न्यूज) नूर खान (आधार न्यूज) बाळू पाटील (अमळनेर समाचार) आदि पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात शिक्षक दिनाचे खरे मानकरी तात्यासाहेब ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व डॉ‌.सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पुजन कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासो.प्रा.डी डी पाटील मंचावरील उपस्थित मान्यवरांचा हस्ते झाले.

यावेळी आर्टिस्ट विजय पवार,भोंगा चित्रपटात अभिनय असलेले विनय जोशी,
फोटोग्राफर हेंमत पवार यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब प्रा.डी. डी.पाटील, धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाचे चेअरमन तथा धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष रावसाहेब के .डी. पाटील, सचिव राधेश्याम पाटील, आण्णासो पांडुरंग पाटील, संचालक नंदकुमार पाटील, धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय चे प्राचार्य डॉ.प्रमोद पवार, तसेच धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय,जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शांतीनिकेतन प्राथमिक विद्यामंदिर तसेच आयटीआय काॅलेजचे प्राचार्य ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन प्रा.लिलाधर पाटील यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button