चांपा/नागपूर

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या उमरेड तालुकाध्यक्षपदी अनिल पवार

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या उमरेड तालुकाध्यक्षपदी अनिल पवार

चांपा ता -प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या उमरेड तालुकाध्यक्षपदी अनिल पवार
यांची एकमताने निवड करण्यात आली . पुणे येथे झालेल्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना महाराष्ट्र राज्याच्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष .डि .टी .आंबेगावे यांनी उमरेड तालुक्यातील ग्रामिणचे पत्रकार अनिल पवार यांच्या महाराष्ट्रातील पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल संघटनेच्या विचाराधीन असल्याने संघटनेत सामील होण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला . उमरेड ग्रामीणचे पत्रकार अनिल पवार यांची प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने उमरेड तालुकाध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना महाराष्ट्र राज्याचे केंद्रीय कार्यालय पुणे येथे महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची व पत्रकारंची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डि .टी .आंबेगावे होते यावेळी राज्यांतील संघटनेचे पदाधिकारी व जेष्ठ पञकार उपस्थित होते सर्व सभासदानी अनिल पवार यांची उमरेड तालुकाध्यक्ष पदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली तर संघटनेच्या इतर सर्व निवडी बिनविरोध करण्यात आल्या.महाराष्ट्र शासन प्राप्त प्रेस संपादक व सेवा संघटना महाराष्ट्र राज्यांच्या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांना संघटनेचे नियूक्ती पत्र देऊन सर्व उपस्थित सदस्य यांच्या अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . प्रेस संस्थापक सेवा संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष डि .टी आंबेगावे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची जबाबदारी देत उमरेड तालुकाध्यक्षपदी सर्वानुमते माझी बिनविरोध निवड करण्यात आली असून या निवडीच्या माध्यमातून संघटनेच्या हितासाठी भविष्यात काम करणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button