Maharashtra

झालं काम दमदार खासदार कडून मंत्रालयाच्या पायरीवर उपोषणाचा खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या दणक्याचा परिणाम

झालं काम दमदार खासदार कडून
मंत्रालयाच्या पायरीवर उपोषणाचा खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या दणक्याचा परिणाम

चाळीसगाव पालिकेचा वनवास अखेर संपला
नवीन मुख्याधिकारी नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी यांना शासनाचे पत्र.
शहरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण..

प्रतिनीधी मनोज भोसले

चाळीसगाव – नगरोत्थान योजनेत 90 कोटी,150 कोटींच्या महत्वाकांक्षी भुयारी गटार योजनेतील पहिल्या टप्प्यातील 70 कोटी, 22 कोटींचा घनकचरा प्रकल्प याच बरोबर कोट्यावधी रुपयांची शहर सुशोभीकरण, एलइडी विद्युत दिवे योजना अशा अनेक योजनेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मोठा निधी आणून शहराच्या विकासाला गती देण्याचे काम सुरू असतांना गेल्या बारा महिन्यापासून चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने शहरवासीयांची कामे खोळंबली होती.तर विकास कामांची गती मंदावली होती .यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. यासाठी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी नगर सचिवांना भेटून येत्या चोवीस तासात मुख्याधिकारी नेमणूक न झाल्यास मंत्रालयाच्या पायरीवर उपोषणाचा इशारा दिला होता. या दणक्याने अखेर यंत्रणा खडबडून जागी झाली असल्याने चाळीसगाव पालिकेचा वनवास अखेर संपला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयास नवीन मुख्याधिकारी नियुक्तीबाबत आदेश प्राप्त झाले असून खासदारांच्या दणक्याने पालिकेला मुख्याधिकारी मिळत असल्याने शहरवासीयांमध्ये खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या भूमिकेचे कौतुक होत आहे..

खासदारांच्या दणक्याने अखेर वनवास संपला

नगरपरिषद अंतर्गत गेल्या काही वर्षात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ,पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या नगरोत्थान योजनेतील नव्वद कोटीचा निधी आणून शहराच्या विकासात भर घातली, दीडशे कोटी रुपयाची महात्वकांक्षी भुयारी गटार योजना यातील 70 कोटी रुपये नगरपालिकेला मिळून कामाला सुरुवात झाली, घनकचरा प्रकल्पासाठी 22 कोटी रुपये तसेच कोट्यावधी रुपयाची एलईडी योजना गतिमान करून शहरवासीयांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मेहनत घेतली होती मात्र गेल्या वर्षभरापासून मुख्याधिकारी नसल्याने ही कामे खोळंबली आहेत तसेच नागरिकांचा रोष देखील वाढत असल्यााने नगर विकास सचिव पाठक यांच्या दालनात त्यांची भेट घेऊन चोवीी तासांत सलिकेवर मुख्याधिकार्‍यांची नेमणूक न झाल्यास मंत्रालयाच्या पायरीवर उपोषणाचा इशारा दिला होता या अनुषगाने नवीन मुख्याधिकारी नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी यांना शासनाचे पत्र प्राप्त झाल्याने पालिकेला लवकरच नवीन मुख्याधिकारी नियुक्ती करण्यात येणार आहे.खासदार उन्मेश दादा पाटील यांचा खंबीर पवित्रा घेतल्याने शासन खडबडून जागे झाले असून पालिकेला मुख्याधिकारी नेमणुकीसाठी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी घेतलेली खंबीर भूमिकेचे शहरवासीयांकडून जोरदार स्वागत होत असून नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button