Bollywood

बालिका वधू ह्या मालिकेतील या तीन मुख्य पात्रांची अकाली मनाला चटका लावणारी एक्झिट..!

बालिका वधू ह्या मालिकेतील या तीन मुख्य पात्रांची अकाली एक्झिट..!

मुंबई : दूरदर्शन वरील बालिका वधू ही अत्यंत गाजलेली मालिका होती.समाजातील बाल विवाह चालीरीतीवर आधारित ह्या मालिकेला चाहत्यांनी खूप पसंद केलं होतं.आधुनिक काळात देखील ठीक ठिकाणी होणारे बाल विवाह ही चिंताजनक बाब असून ह्या अनिष्ट प्रथेवर आधारित ह्या मालिकेचे कथानक होते. मालिकेतील सर्वच कलाकारांनी मन लावून काम केल्याने अत्यंत कमी वेळात चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली होती.ह्या मालिकेतील तिन्ही मुख्य कलाकार आज या जगात नाहीत. अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी, ज्येष्ठ अभिनेत्या सुरेखा सिकरी यांच्यानंतर आता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने या जगाचा निपोप घेतला आहे.

प्रत्युशा बॅनर्जी

बालिका वधू ह्या मालिकेतील मुख्य अभिनेत्री जिच्या भोवती संपूर्ण मालिकेचे कथानक फिरते अशी बालिका वधू म्हणजेच अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी ने केलेल्या आत्महत्येमुळे मृत्यू झाला. वयाच्या 25 व्या वर्षी म्हणजेच 1 एप्रिल 2016 मध्ये प्रत्युषाने जगाचा निरोप घेतला.तिच्या गोरेगाव येथील राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आली होती. तिच्या संशयास्पद मृत्युने सर्वांनांच मोठा धक्का बसला होता.तिच्या मृत्यूनंतर अनेक तर्क-वितर्क करण्यात आले होते.

सुरेखा सिकरी

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सिकरी 16 जुलै 2020 रोजी निधन झालं. सुरेखा सिकरी ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने कलाविश्वाला मोठा धक्का बसला. सुरेखा सिकरी यांनी बालिका वधू मालिकेत दादी नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.अत्यन्त हटके असलेली ही भूमिका आणि सिकरी यांचा दर्जेदार अभिनय चाहत्यांना आवडला होता.

सिद्धार्थ शुक्ला

सिद्धार्थ शुक्लाने अगदी अनपेक्षितपणे जगाचा अखेरचा निरोप घेतला.सिद्धार्थने मालिकेत आयएएस अधिकारी शिवराज शेखरच्या भूमिकेत होता.शिवराज शेखर एक प्रामाणिक अधिकाऱ्यासोबत कुटुंबाची काळजी घेणारा आणि पत्नीवर जीवापाड प्रेम करणारा पतीची व्यक्तीरेखा साकारली होती.आणि आता तोही ह्या दुनियेत नाही.

बालिका वधू ह्या अत्यंत प्रसिद्ध मालिकेतील ह्या तीनही व्यक्तिरेखांचं अचानक जाणं मनाला चटका लावून गेलं.प्रत्युशा आणि सिद्धार्थ हे दोन देखील तरुण कलाकार होते.आणि अभिनय क्षेत्रात चांगलाच ठसा या तीनही कलाकारांनी उमटविला होता…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button