Amalner

प्रताप महाविद्यालयाचा अनेक प्रतापांपैकी “प्रताप”..! विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे टाळा ठोक अंदोलन…

प्रताप महाविद्यालयाचा अनेक प्रतापांपैकी प्रताप..! विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे टाळा ठोक अंदोलन…

अमळनेर प्रताप महाविद्यालय हे पूर्वी एक नामवंत महाविद्यालय म्हणून विख्यात होते.पण आता या महाविद्यालयाच्या अनेक विचित्र प्रतापांमुळे हे महाविद्यालय प्रसिद्ध आहे. आता प्रताप महाभयानक प्रताप समोर आला असून टीवायबीएस्सीच्या विद्यार्थ्यांना नापास करून नवा इतिहासच या महाविद्यालयाने रचला आहे.जवळजवळ 70 विद्यार्थ्यांना परीक्षा देऊनही अनुपस्थित दाखवत नापास करण्यात आले आहे.या मुळे आक्रमक होत विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयात टाळा ठोक आंदोलन केले.तसेच जोरदार विरोध नोंदविला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की महाविद्यालयातील बीएस्सी च्या शेवटच्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा देऊन देखील अनुपस्थित दाखवत नापास करण्यात आले आहे.कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापन काळात सर्वच शाळा महाविद्यालये बंद असून फक्त ऑनलाइन क्लासेस व परीक्षा घेण्यात येण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोरोनामुळे सामान्य माणसाची आर्थिक व रोजगार परिस्थिती खराब झाली असताना ग्रामीण भागातील विद्यार्थी तडजोड करत शिक्षण घेत आहेत. अश्या परिस्थितीत महाविद्यालयाच्या अश्या बेजबाबदार पणा मुळे प्रताप च्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नापास विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेकडे तक्रार केल्यानंतर सदर विषय सामोपचाराने सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता पण प्रताप महाविद्यालयाचे निगरगठ्ठ प्रशासन ठिम्म राहिले.परिणामी आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयाला टाळे ठोकून प्रशासनाला विरोध करत न्याय मिळविण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला. एक तास महाविद्यालयात शुद्ध भाषेत दांगडो घातल्यानंतर डुलत डुलत महाविद्यालयाचे संचालक तिथे उपस्थित झाले. येत्या दोन दिवसांत सदर विषय न्याय पूर्वक निकाली काढून मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले आहे.राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेचे प्रदेश सचिव भूषण भदाणे, तालुका अध्यक्ष श्रीनाथ पाटील,शहराध्यक्ष सुनील शिंपी,विदयार्थी मयूर पाटील, भूषण पाटील,सागर पाटील, सागर राजपूत, कृष्णा बोरसे, दिव्या बडगुजर, सनी गायकवाड, हेमराज पाटील, चेतन पाटील, गौरव पाटील, अभिषेक धमाळ सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button